- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
'वन्दे भारत' ते 'देवी शक्ती'; युद्धजन्य परिस्थितीत भारताने अशी केलीय नागरिकांची सुटका

2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत भारताने 800 नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणले.

2020-21 मध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताने वंदे भारत मिशन अंतर्गत तब्बल 71 लाखांहून अधिक भारतीय नागरिकांना भारतात परत आणले.

2015 मध्ये झालेल्या येमेन सिव्हील वारच्या दरम्यान भारताने ऑपरेशन राहत राबवलं. याअंतर्गत 4640 भारतीय नागरिकांसह एकूण 5600 लोकांची सुखरुप सुटका केली. विशेष अमेरिकेसह एकूण 26 राष्ट्रांनी भारताला मदतीचे आवाहन केलं होते.

भारतीय नौदलांनासुद्धा ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्याच्या कार्यात महत्त्वाची भुमिका बजावली. नेपाळमध्ये 2015 ला झालेल्या मोठ्या भुकंपानंतर भारताने ऑपरेशन मैत्री अंतर्गत तब्बल 7000 भारतीय आणि 170 परदेशी नागरिकांची सुटका केली.

ऑपरेशन सेफ होमकमिंग 2011 ला भारताने राबवलेलं महत्त्वाचं ऑपरेशन होतं. लिबिया-सिरिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने हवाई आणि जलमार्गांनी सुमारे 15000 नागरिकांना मायदेशी परत आणलं.

इस्राईल हेजबोल्लाह युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सुकूनअंतर्गत 2006 मध्ये 1800 भारतीयांसह 2280 लोकांची सुटका केली. यामध्ये भारतासोबतच श्रीलंकन, नेपाळी तसेच लेबनानच्या नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणलं.

1990 मध्ये पर्शियन गल्फ युद्ध सुरु होते. या दरम्यान सद्दाम हुसेनने कुवेतवर आक्रमण केले होतं. या काळात सुमारे 1लाख 70 हजारांहून अधिक भारतीय नागरिक अडकले होते. यावेळी एअर इंडियाने तब्बल 488 विमानांच्या फेऱ्या मारून या नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणले.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.