IPL 2022 : हे विदेशी खेळाडू मुकणार आयपीएलचे सामने?

इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL) लवकरच सुरू होणार आहे पहिला सामना 26 मार्च रोजी मुंबईत होणार आहे.
Indian Premier League 2022 start soon foreign players will not play IPL matches
Indian Premier League 2022 start soon foreign players will not play IPL matchessakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL) लवकरच सुरू होणार आहे पहिला सामना 26 मार्च रोजी मुंबईत होणार आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने असतील. पण यावेळी आयपीएल संघांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण अनेक आंतरराष्ट्रीय प्लेयर आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्याला मुकू शकतात.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील सध्या सुरू असलेली कसोटी मालिका २८ मार्च रोजी संपणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटीनंतर, एक वनडे मालिकाही होणार आहे, जी 5 एप्रिल रोजी संपणार आहे.
वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील सध्या सुरू असलेली कसोटी मालिका २८ मार्च रोजी संपणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटीनंतर, एक वनडे मालिकाही होणार आहे, जी 5 एप्रिल रोजी संपणार आहे.sakal
याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील वनडे, कसोटी मालिका १२ एप्रिलला संपणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे अनेक मोठे प्लेयर आयपीएलमध्ये सहभागी होतात, बीसीसीआयने या मालिकेबाबत आफ्रिकन बोर्डाशीही चर्चा केली आहे.
याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील वनडे, कसोटी मालिका १२ एप्रिलला संपणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे अनेक मोठे प्लेयर आयपीएलमध्ये सहभागी होतात, बीसीसीआयने या मालिकेबाबत आफ्रिकन बोर्डाशीही चर्चा केली आहे.sakal
कोणत्या संघाचे प्लेयर आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्याला मुकू शकतात? त्यात चेन्नई सुपर किंग्जचा ड्वेन प्रिटोरिस, मुंबई इंडियन्सचा जोफ्रा आर्चर, कोलकाता नाईट रायडर्सचा पॅट कमिन्स, अॅरॉन फिंच यांचा समावेश आहे.
कोणत्या संघाचे प्लेयर आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्याला मुकू शकतात? त्यात चेन्नई सुपर किंग्जचा ड्वेन प्रिटोरिस, मुंबई इंडियन्सचा जोफ्रा आर्चर, कोलकाता नाईट रायडर्सचा पॅट कमिन्स, अॅरॉन फिंच यांचा समावेश आहे.sakal
याशिवाय राजस्थान रॉयल्सच्या रासी व्हॅन डेर दुसे, सनरायझर्स हैदराबादचा मार्को जॅन्सन, शॉन अॅबॉट, एडन मार्कराम या खेळाडूंचा समावेश आहे.
याशिवाय राजस्थान रॉयल्सच्या रासी व्हॅन डेर दुसे, सनरायझर्स हैदराबादचा मार्को जॅन्सन, शॉन अॅबॉट, एडन मार्कराम या खेळाडूंचा समावेश आहे.sakal
सर्वात जास्त नुकसान दिल्ली आणि लखनौच्या संघाचे होत आहे. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, अँरिक नोर्किया (दुखापत), मुस्तफिझूर रहमान, दिल्ली कॅपिटल्सच्या लुंगी एनगिडी या खेळाडूंचा समावेश आहे.
सर्वात जास्त नुकसान दिल्ली आणि लखनौच्या संघाचे होत आहे. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, अँरिक नोर्किया (दुखापत), मुस्तफिझूर रहमान, दिल्ली कॅपिटल्सच्या लुंगी एनगिडी या खेळाडूंचा समावेश आहे.
तर लखनौ सुपर जायंट्सचे मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, काइल मेयर्स, मार्क वुड, क्विंटन डी कॉक सुरुवातीच्या सामन्यांना मुकू शकतात.
तर लखनौ सुपर जायंट्सचे मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, काइल मेयर्स, मार्क वुड, क्विंटन डी कॉक सुरुवातीच्या सामन्यांना मुकू शकतात.sakal
बेंगळुरूचे तीन खेळाडू, जेसन बेहरेनडॉर्फ, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड, पंजाब किंग्जचे जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, नॅथन एलिस आणि गुजरात जायंट्सचे डेव्हिड मिलर, अल्झारी जोसेफ यांनाही वगळले जाऊ शकते.
बेंगळुरूचे तीन खेळाडू, जेसन बेहरेनडॉर्फ, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड, पंजाब किंग्जचे जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, नॅथन एलिस आणि गुजरात जायंट्सचे डेव्हिड मिलर, अल्झारी जोसेफ यांनाही वगळले जाऊ शकते.sakal
आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे आणि अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. तर शेवटचा साखळी सामना 22 मे रोजी होणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये 12 डबल-हेडर आहेत.
आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे आणि अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. तर शेवटचा साखळी सामना 22 मे रोजी होणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये 12 डबल-हेडर आहेत.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com