IPL 2022: 'या' फलंदाजांची बॅट हंगामात तळपण्याच्या प्रतिक्षेत

IPL 2022 fans will keep eye on these Five Batsmen in this season aas86
IPL 2022 fans will keep eye on these Five Batsmen in this season aas86esakal
Updated on

मुंबई : टी 20 हा फलंदाजांचा खेळ त्यात आयपीएल (IPL 2022) या मनोरंजानासाठी ओळखली जाणाऱ्या स्पर्धेत षटकार आणि चौकारांना विशेष असे महत्व आहे. यंदाच्या हंगामात अनेक फलंदजांच्या (Batsmen) खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) |
कोलकाता नाईट रायडर्सचा हा नवा कर्णधार एकहाती सामना जिंकून देण्याची ताकद ठेवतो. त्याने आतापर्यंत 87 आयपीएल सामन्यात 2375 धावा केल्या आहेत. तो आता नव्या भुमिकेला साजेशी खेळी करण्यासाठी उत्सुक असणार आहे. त्याने भारताकडून खेळताना गेल्या काही सामन्यात दमदार कमागिरी केली आहे. आता हीच कामगिरी तो केकेआरकडून खेळताना करतो का हे पहावे लागेल.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) | कोलकाता नाईट रायडर्सचा हा नवा कर्णधार एकहाती सामना जिंकून देण्याची ताकद ठेवतो. त्याने आतापर्यंत 87 आयपीएल सामन्यात 2375 धावा केल्या आहेत. तो आता नव्या भुमिकेला साजेशी खेळी करण्यासाठी उत्सुक असणार आहे. त्याने भारताकडून खेळताना गेल्या काही सामन्यात दमदार कमागिरी केली आहे. आता हीच कामगिरी तो केकेआरकडून खेळताना करतो का हे पहावे लागेल.esakal
विराट कोहली (Virat Kohli) |
विराट कोहली सध्या पृथ्वीतलावरील सर्वात टेन्शन फ्री माणूस आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र आता निवांत प्राणी होऊनही विराट कोहलीच्या बॅटमधून म्हणाव्या तशा धावा निघत नाहीयेत. आरसीबीचा कर्णधार असताना देखील तो धडाकेबाज फलंदाजी करत होता. आता त्याच्या डोक्यावरून कर्णधार पदाचा काटेरी मुकूट देखील उतरला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्याच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा असणार.
विराट कोहली (Virat Kohli) | विराट कोहली सध्या पृथ्वीतलावरील सर्वात टेन्शन फ्री माणूस आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र आता निवांत प्राणी होऊनही विराट कोहलीच्या बॅटमधून म्हणाव्या तशा धावा निघत नाहीयेत. आरसीबीचा कर्णधार असताना देखील तो धडाकेबाज फलंदाजी करत होता. आता त्याच्या डोक्यावरून कर्णधार पदाचा काटेरी मुकूट देखील उतरला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्याच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा असणार. esakal
शिखर धवन (Shikhar Dhawan) |
गेल्या सहा आयपीएल हंगामापासून शिखर धवन सातत्याने 450 च्या वर धावा केल्या आहेत. धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5784 धावा केल्या असून त्याचा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये विराटनंतर दुसरा क्रमांक लागतो. त्याला आयपीएलमध्ये 6000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी फक्त 216 धावांची गरज आहे. याचबरोबर त्याला पंजाबचा त्याच्यासाठी 8.25 कोटी रूपये मोजण्याचा निर्णय देखील सार्थ ठरवून दाखवावा लागणार आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan) | गेल्या सहा आयपीएल हंगामापासून शिखर धवन सातत्याने 450 च्या वर धावा केल्या आहेत. धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5784 धावा केल्या असून त्याचा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये विराटनंतर दुसरा क्रमांक लागतो. त्याला आयपीएलमध्ये 6000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी फक्त 216 धावांची गरज आहे. याचबरोबर त्याला पंजाबचा त्याच्यासाठी 8.25 कोटी रूपये मोजण्याचा निर्णय देखील सार्थ ठरवून दाखवावा लागणार आहे. esakal
जॉस बटलर (Jos Buttler) |
जॉस बटलर आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्याची क्षमता ठेवतो. राजस्थान रॉयल्सने यासाठीच त्याला रिटेन केले होते. बटलरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 65 सामन्यात 1968 धावा केल्या आहेत. त्यात आता मुंबई आणि पुण्यातील फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर खेळण्याचा फायदा बटलरला होणार आहे.
जॉस बटलर (Jos Buttler) | जॉस बटलर आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्याची क्षमता ठेवतो. राजस्थान रॉयल्सने यासाठीच त्याला रिटेन केले होते. बटलरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 65 सामन्यात 1968 धावा केल्या आहेत. त्यात आता मुंबई आणि पुण्यातील फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर खेळण्याचा फायदा बटलरला होणार आहे. esakal
डेव्हिड वॉर्नर (David Warner) |
गेल्या हंगामात खराब बॅटिंग फॉर्ममुळे डेव्हिड वॉर्नरला सनरायजर्स हैदराबादच्या कॅप्टन्सी बरोबरच संघातील स्थान देखील गमवावे लागले होते. मात्र वॉर्नरने त्यानंतर झालेल्या टी 20 वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया कडून खेळताना आपण बॅड पॅचमध्ये नसल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळेच त्याला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या गोटात सामील करून घेतले आहे. वॉर्नरने 150 आयपीएल सामन्यात आतापर्यंत 5449 धावा केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) | गेल्या हंगामात खराब बॅटिंग फॉर्ममुळे डेव्हिड वॉर्नरला सनरायजर्स हैदराबादच्या कॅप्टन्सी बरोबरच संघातील स्थान देखील गमवावे लागले होते. मात्र वॉर्नरने त्यानंतर झालेल्या टी 20 वर्ल्डकप आणि ऑस्ट्रेलिया कडून खेळताना आपण बॅड पॅचमध्ये नसल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळेच त्याला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या गोटात सामील करून घेतले आहे. वॉर्नरने 150 आयपीएल सामन्यात आतापर्यंत 5449 धावा केल्या आहेत. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com