काय तो समुद्रकिनारा आणि काय ते जॅकी श्रॉफचं आलिशान घर सगळं ओके मध्ये आहे...
बॉलीवुडच्या माध्यमातून घराघरांत मनोरंजन करणारे आणि आपल्या सिनेमांतून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जॅकी श्रॉफने १९८२ साली स्वामी दादांसोबत सिमेसृष्टीतील प्रवास सुरू केला होता. बघता बघता जॅकी श्रॉफने बॉलीवुडचे अनेक चित्रपट गाजवले. आणि चित्रपटातून पैसाही तेवढाच कमावला. त्यांचे आलेशान घर एकदा बघाच.
नुकतंच जॅकी श्रॉफने मुंबईच्या खार परिसरात 'रूस्तमजी पॅरामाऊंट' येथे एक आलेशान घर घेतले आहे. या आलिशान घराचे फोटो बघून तुम्हीही या घराच्या प्रेमात पडाल.
हे आलेशान घर घेण्याआधी श्रॉफ कुटुंब वांद्रेतील कार्टर रोडच्या घरी राहात होते.या आलिशान घराची किंमत बघून तुम्ही थक्क व्हाल. आठ बेडरूमचं हे भव्य आलिशान घर मुंबईत श्रॉफ यांनी घरी घेतलंय.
श्रॉफ कुटुंबाच्या या आलिशान घरामध्ये ओपन एअर जिम, रॉक क्लाइंबिंग एरिया, डान्स स्टुडिओ आणि स्टार गेझिंग डेक यांसारख्या सुविधा आहेत.
या आलेशान घराची किंमत तब्बल ३१.५ कोटी रूपये एवढी आहे. टायगर श्रॉफ अनेकदा जिम वर्कआऊट करताना किंवा डान्स प्रॅक्टिस करताना त्याच्या आलिशान घराचे फोटोज टाकत असतो.
प्रसिद्ध डिझायनर सुझैन खाननेदेखील हे घर बनत असताना काही आईडिया सुचवल्या होत्या. या संपूर्ण घराला अब्राहम जॉनने डिझाईन केले आहे.
जॅकी श्रॉफ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास जुलैमध्ये रिलीज होणाऱ्या 'ओम: द बॅटल विदिन अप' या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि संजना सांघाबरोबर दिसणार आहे.