कारहुन्नवी सणानिमित्त शेतकऱ्यांनी केली पशुधनाची पूजा

बैलजोड्यांच्या मिरवणूकीत मल्लखांबच्या कसरतीने वेधले लक्ष
Karhunnavi Festival News
Karhunnavi Festival Newsesakal

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यातील अनेक गावांत मंगळवारी (ता. १४) कारहुन्नवी साजरा करण्यात आला. दरम्यान गेल्या दोन-अडीच वर्षात कोरोनाचे सावट असल्याने सण, उत्सव उत्साहात साजरे करणे शक्य नव्हते. मात्र आता उत्साह वाढला आहे. शेतकरी बांधव कर्नाटकी बेंदूर (कारहुन्नवी) सण मोठ्या उत्साहात साजरा करतो.

प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि तिथी बदलत असल्याचे पाहायला मिळते. कृषी संस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com