PHOTO - कृष्णाकाठचे पाहुणे रुसलेत?

PHOTO - कृष्णाकाठचे पाहुणे रुसलेत?
Updated on
Summary

सांगलीकर निसर्गप्रेमींना चिंता वाटावी, अशी बातमी आहे. विदेशातून हजारो मैलांचा प्रवास करून कृष्णा, वारणा नद्यांच्या काठावर काही दिवस पाहुणे म्हणून येणाऱ्या पक्ष्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. या पक्ष्‍यांना प्रवास मार्गात अन्य उत्तम नैसर्गिक अधिवास गवसला आहे की इथल्या परिस्थितीत काही बदल झाला आहे, याचा नेमका अभ्यास पक्षीमित्रांनी सुरू केला आहे. हीच स्थिती जगविख्यात मायणीत आहे. या पक्ष्‍यांनी इथे यावे, अशी सुयोग्य स्थिती निर्माण करणे गरजेचे आहे. अर्थात, मानवी प्रश्‍नांच्या जंजाळातून सुटून पक्ष्यांकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला आहे?

हे पक्षी आढळतात सांगलीत 

पाहुण्या पक्ष्यांत बदकाच्या प्रामुख्याने चार प्रजाती आढळतात. बार हेडेड गुस (राजहंस), चक्रवाग, भुई, चक्रांग यांचा समावेश आहे. शिकारी पक्ष्यांत मार्श हॅरियर पक्षी, कॉमन सँडपाइपर (सामान्य तुतारी), मार्श सँडपाइपर (चिकनी तुतारी), ग्रीन सँडपाइपर (हेल्दी तुतारी), काळ्या शेपटीचा टिलवा, मोठा स्पॉट असणारा गरूड (greater spotted eagle) यांसह तीस ते चाळीस जातीचे पक्षी आढळतात, असे पक्षीतज्ज्ञ शरद आपटे यांनी सांगितले.
हे पक्षी आढळतात सांगलीत पाहुण्या पक्ष्यांत बदकाच्या प्रामुख्याने चार प्रजाती आढळतात. बार हेडेड गुस (राजहंस), चक्रवाग, भुई, चक्रांग यांचा समावेश आहे. शिकारी पक्ष्यांत मार्श हॅरियर पक्षी, कॉमन सँडपाइपर (सामान्य तुतारी), मार्श सँडपाइपर (चिकनी तुतारी), ग्रीन सँडपाइपर (हेल्दी तुतारी), काळ्या शेपटीचा टिलवा, मोठा स्पॉट असणारा गरूड (greater spotted eagle) यांसह तीस ते चाळीस जातीचे पक्षी आढळतात, असे पक्षीतज्ज्ञ शरद आपटे यांनी सांगितले.
पक्ष्यांच्या स्थलांतराचे गूढ 

हजारो मैल प्रवास करून पक्षी योग्य जागी कसे येत असावेत, असे आपणास वाटू शकते. पक्ष्यांचा मार्ग निश्‍चित असतो. सूर्य, तारे यांचा होकायंत्राप्रमाणे वापर करतात. आंतरिक घड्याळाचा उपयोग करतात. हवामानाचा अचूक अंदाज घेतात. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, गुरुत्वाकर्षण यांचे ज्ञान त्यांना असते. विविध पक्षी यापैकी विविध साधनांचा वापर करून प्रवास करतात. अर्थात, हे असेच होते, याला वैज्ञानिक आधार नाही, ही पक्षी तज्ज्ञांची निरीक्षणे आहेत.
पक्ष्यांच्या स्थलांतराचे गूढ हजारो मैल प्रवास करून पक्षी योग्य जागी कसे येत असावेत, असे आपणास वाटू शकते. पक्ष्यांचा मार्ग निश्‍चित असतो. सूर्य, तारे यांचा होकायंत्राप्रमाणे वापर करतात. आंतरिक घड्याळाचा उपयोग करतात. हवामानाचा अचूक अंदाज घेतात. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, गुरुत्वाकर्षण यांचे ज्ञान त्यांना असते. विविध पक्षी यापैकी विविध साधनांचा वापर करून प्रवास करतात. अर्थात, हे असेच होते, याला वैज्ञानिक आधार नाही, ही पक्षी तज्ज्ञांची निरीक्षणे आहेत.
‘तो’ करार कागदावरच 

इराणमध्ये १९७१ साली ‘कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्ड्स’ जागतिक परिषदेत पक्षी संवर्धनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन, पर्यावरणपूरक वापराचा जागतिक आराखडा ठरला. सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ, मदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश, वाहते किंवा शांत पाणी असलेली पाणस्थळे, बारमाही तसेच हंगामी स्त्रोत यांचा त्यात समावेश केला. भारताने १९८२ मध्ये या ‘रामसर करारा’वर सही केली, मात्र या विषयावर गांभीर्याने काम झाले नाही. पक्ष्‍यांची ही आश्रयस्थाने कागदावरच राहिली.
‘तो’ करार कागदावरच इराणमध्ये १९७१ साली ‘कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्ड्स’ जागतिक परिषदेत पक्षी संवर्धनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन, पर्यावरणपूरक वापराचा जागतिक आराखडा ठरला. सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ, मदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश, वाहते किंवा शांत पाणी असलेली पाणस्थळे, बारमाही तसेच हंगामी स्त्रोत यांचा त्यात समावेश केला. भारताने १९८२ मध्ये या ‘रामसर करारा’वर सही केली, मात्र या विषयावर गांभीर्याने काम झाले नाही. पक्ष्‍यांची ही आश्रयस्थाने कागदावरच राहिली.
मायणीकडे फ्लेमिंगोची पाठ 

२००३ च्या दुष्काळानंतर विदेशी पक्ष्‍ंयांनी मायणी तलावाकडे पाठ फिरवली आहे. फ्लेमिंगो पक्षांचे हे मुख्य स्थान होते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे पक्षी येतात. वातावरण बदलामुळे हा बदल झाला असावा, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. दोन वर्षांपूर्वी तीनच पक्षी आले होते. ते पायलट म्हणून आले असावेत, असा अंदाज होता. थवा पुन्हा येईल, ही अपेक्षा तेव्हाही फोल ठरली. हा बदल निसर्गप्रेमींसाठी निराशाजनक आहे.
मायणीकडे फ्लेमिंगोची पाठ २००३ च्या दुष्काळानंतर विदेशी पक्ष्‍ंयांनी मायणी तलावाकडे पाठ फिरवली आहे. फ्लेमिंगो पक्षांचे हे मुख्य स्थान होते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे पक्षी येतात. वातावरण बदलामुळे हा बदल झाला असावा, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. दोन वर्षांपूर्वी तीनच पक्षी आले होते. ते पायलट म्हणून आले असावेत, असा अंदाज होता. थवा पुन्हा येईल, ही अपेक्षा तेव्हाही फोल ठरली. हा बदल निसर्गप्रेमींसाठी निराशाजनक आहे.
वेग अन् उड्डाण 

काही पक्षी एक ते दीड हजार मीटर उंचीवरून उड्डाण करतात. त्यांचा प्रवास वेग ४० किलोमीटरपर्यंत असतो. वसंत ऋतूत जास्त वेगाने, तर शरद ऋतूत मंद गतीने प्रवास होतो. अमेरिकेतील चिपिंग स्पॅरो २४ ते ३०; कॅनडातील लांब शेपटीचे बंदक ८५ ते ११५; अमेरिकन ससाणा २५० ते ३०० किलोमीटर वेगाने प्रवास करतात. काही लहान पक्षी समुद्रावरून सुमारे ३६०० किमी अंतर सरासरी ८६ तासांत पार करतात. हे सगळे पक्षी सांगलीत येतात.
वेग अन् उड्डाण काही पक्षी एक ते दीड हजार मीटर उंचीवरून उड्डाण करतात. त्यांचा प्रवास वेग ४० किलोमीटरपर्यंत असतो. वसंत ऋतूत जास्त वेगाने, तर शरद ऋतूत मंद गतीने प्रवास होतो. अमेरिकेतील चिपिंग स्पॅरो २४ ते ३०; कॅनडातील लांब शेपटीचे बंदक ८५ ते ११५; अमेरिकन ससाणा २५० ते ३०० किलोमीटर वेगाने प्रवास करतात. काही लहान पक्षी समुद्रावरून सुमारे ३६०० किमी अंतर सरासरी ८६ तासांत पार करतात. हे सगळे पक्षी सांगलीत येतात.
"बहुतांश पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. उत्तरेकडे बर्फ पडू लागला की स्थलांतर होते. सांगलीत ३५ ते ४० प्रजातींचे पक्षी आढळतात. १९९० पासून पक्षी निरीक्षण करतो. गेल्या काही वर्षांत निसर्गातील बदलांमुळे पाहुणे पक्ष्यांची संख्या कमी झालीय. सप्टेंबरमध्ये पक्षी येऊ लागतात. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची हजेरी ठळक दिसते. नुकताच मार्श हॅरियर दिसला आहे."

- शरद आपटे, पक्षीतज्ज्ञ, सांगली 

"समुद्र किनाऱ्यावरील तेलखाणी, पवनचक्क्या, विजेच्या तारा, कारखाने अडथळा ठरतात. शिकारही वाढली आहे. वादळ, वणवा, सिमेंट जंगलात स्थलांतरित पक्षी भरकटले आहेत. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या टप्प्यावर आहेत. या पक्ष्यांच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करार झाले. त्यांच्या शिकारीवर बंदी आहे."

- किरण नाईक, प्राणी-पक्षी मित्र
"बहुतांश पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. उत्तरेकडे बर्फ पडू लागला की स्थलांतर होते. सांगलीत ३५ ते ४० प्रजातींचे पक्षी आढळतात. १९९० पासून पक्षी निरीक्षण करतो. गेल्या काही वर्षांत निसर्गातील बदलांमुळे पाहुणे पक्ष्यांची संख्या कमी झालीय. सप्टेंबरमध्ये पक्षी येऊ लागतात. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची हजेरी ठळक दिसते. नुकताच मार्श हॅरियर दिसला आहे." - शरद आपटे, पक्षीतज्ज्ञ, सांगली "समुद्र किनाऱ्यावरील तेलखाणी, पवनचक्क्या, विजेच्या तारा, कारखाने अडथळा ठरतात. शिकारही वाढली आहे. वादळ, वणवा, सिमेंट जंगलात स्थलांतरित पक्षी भरकटले आहेत. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या टप्प्यावर आहेत. या पक्ष्यांच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करार झाले. त्यांच्या शिकारीवर बंदी आहे." - किरण नाईक, प्राणी-पक्षी मित्र
"सन २००७ पासून पक्षी निरीक्षण करतो. परदेशी पक्ष्यांची संख्या कमी होतेय. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियालही धोक्यात आहे. त्याच्यावर काम व्हायला हवे."

- प्रमोद जगताप, पक्षी निरीक्षक, सांगली 

"वाढते प्रदूषण, वातावरणातील व ऋतुचक्रातील सतत बदलामुळे जीवनचक्रात बदल होताहेत. पक्ष्यांची संख्या घटली आहे. परदेशी पाहुण्यांची संख्या कमी झाली आहे. पक्ष्यांसाठी पोषक वातावरण तयार करणे व पक्षी प्रजनन केंद्र सुरक्षित करणे आवश्‍यक आहे." 

- प्रा. शशिकांत ऐनापुरे, पक्षी निरीक्षक, सांगली
"सन २००७ पासून पक्षी निरीक्षण करतो. परदेशी पक्ष्यांची संख्या कमी होतेय. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियालही धोक्यात आहे. त्याच्यावर काम व्हायला हवे." - प्रमोद जगताप, पक्षी निरीक्षक, सांगली "वाढते प्रदूषण, वातावरणातील व ऋतुचक्रातील सतत बदलामुळे जीवनचक्रात बदल होताहेत. पक्ष्यांची संख्या घटली आहे. परदेशी पाहुण्यांची संख्या कमी झाली आहे. पक्ष्यांसाठी पोषक वातावरण तयार करणे व पक्षी प्रजनन केंद्र सुरक्षित करणे आवश्‍यक आहे." - प्रा. शशिकांत ऐनापुरे, पक्षी निरीक्षक, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com