Tollywood movie: आपल्याला काम करण्याची काही एक गरज नाही. माझी फी त्यांना परडवणारी नाही. अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेता महेश बाबुनं दिली. आणि बॉलीवूडमध्ये त्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या काही (Bollywood News) दिवसांपासून टॉलीवूड आणि बॉलीवूड यांच्यात वेगवेगळ्या कारणास्तव वाद होत (Mahesh Babu) आहे. सुरुवातीला बॉक्स कमाईचा विषय होता. त्यानंतर तो हिंदी भाषेचा झाला. आता टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता महेश बाबुनं बॉलीवूडविषयी केलेलं भाष्य लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मी ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी सुखी आहे. मला बॉलीवूडमध्ये जाऊन काम करण्याची काही एक गरज नाही. माझी फी त्यांना परडवणारी नाही. असंही त्यानं वक्तव्य केल्याचे दिसून आले आहे.सेलिब्रेटी नेटवर्थ डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार, 32 मिलियन म्हणजे 244 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याची कमाई चित्रपटांपेक्षा जाहिरातीतूनच अधिक होते.
तेलुगू सुपरस्टार म्हणून महेश बाबुची ओळख आहे. त्याचा त्या राज्यांमध्ये फॉलोअर्सही मोठा आहे. त्यानं बॉलीवूडवरुन एक प्रतिक्रिया दिली होती. त्यात मुख्यत्वे करुन त्याच्या मानधनाचा मुद्दा होता.
त्यामुळे भडकलेल्या नेटकऱ्यांनी महेश बाबुवर आगपाखड केली आहे. आता महेशनं आपली बाजु बदलली असून मी केवळ टिंगल करण्याच्या हिशोबानं अशा प्रकारची प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले आहे.
आता नेटकऱ्यांनी महेशचं एका चित्रपटाचं मानधन किती, त्याची एकुण कमाई किती, त्याच्या पर्सनल आयुष्याविषयी माहिती सर्च केली आहे. टॉलीवूडमध्य़े सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून महेश बाबुचे नाव घ्यावे लागेल.
1983 मध्ये महेशबाबुनं फिल्म करिअरमध्ये पाऊल टाकलं. त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील तो अॅक्टिव्ह असणारा सेलिब्रेटी आहे.
वय वर्षे सहा असल्यापासूनच महेश बाबुनं फिल्ममध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानं पोरातम, अर्जुन, पोकिरी, बिझनेसमॅन, आगदू सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
महेशनं फेब्रुवारी 2005 मध्ये मिस इंडिया आणि बॉलीवूडची अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न करणाऱ्या महेशची आणि नम्रताची ओळख 2000 मध्ये वामसीच्या सेटवर ओळख झाली होती.
महेश बाबु हा श्रीमंतीत जगणारा अभिनेता आहे. त्याला महागड्या गाड्यांचा शौक आहे. त्याचा बंगला हा तीस कोटींचा आहे. याशिवाय बंगळुरुमध्ये देखील त्यानं एक नवीन घर खरेदी केली आहे.
महेशकडे मोठी लॅम्बोर्गिनी आहे. त्याची किंमत तीन कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे टोयाटाची लँड क्रुझर, 49 लाखांची मर्सिडिझ,रेंज रोव्हर, दीड कोटीची ऑडी देखील आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महेश हा टक्केवारीत मानधन घेणारा अभिनेता आहे. त्यामुळे चित्रपट जेवढी कमाई करेल करारानुसार ठरलेल्या टक्केवारीत त्याला मानधन मिळते. यावरुन त्याच्या कमाईचा अंदाज येईल.
सेलिब्रेटी नेटवर्थ डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार, 32 मिलियन म्हणजे 244 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याची कमाई चित्रपटांपेक्षा जाहिरातीतूनच अधिक होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.