Photo : पाहा तुमच्या आवडत्या नायिकांनी कशी साजरी केली वटपौर्णिमा..
sakal

Photo : पाहा तुमच्या आवडत्या नायिकांनी कशी साजरी केली वटपौर्णिमा..

मालिका विश्वातही वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली गेली त्याची ही खास क्षणचित्रे..
Published on

वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश. वटपौर्णिमा अवघ्या एका दिवासावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे. सर्व नायिका पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करणार आहेत. १४ जूनला हे भाग प्रदर्शित होतील. यासाठी अत्यंत पारंपरिक वेशात आपल्या नायिका सजल्या आहेत. त्यांचे हे खास फोटो.

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पूने आपल्या घरातील सर्व महिलांसोबत हा सण साजरी केला.
ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पूने आपल्या घरातील सर्व महिलांसोबत हा सण साजरी केला. sakal
फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही कीर्तीने शुभमसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलं आहे. कर्तव्य आणि घरच्या जबाबदाऱ्या अशी कसोटी पार करत कीर्ती आपलं स्वप्न पूर्ण करत आहे. शुभमचा भक्कम पाठिंबा असल्यामुळेच कीर्ती आपलं ध्येय गाठू शकतेय. त्यामुळे कीर्ती-शुभमसाठी यंदाची वटपौर्णिमा खास आहे.
फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही कीर्तीने शुभमसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलं आहे. कर्तव्य आणि घरच्या जबाबदाऱ्या अशी कसोटी पार करत कीर्ती आपलं स्वप्न पूर्ण करत आहे. शुभमचा भक्कम पाठिंबा असल्यामुळेच कीर्ती आपलं ध्येय गाठू शकतेय. त्यामुळे कीर्ती-शुभमसाठी यंदाची वटपौर्णिमा खास आहे. sakal
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप-गौरीसाठीही वटपौर्णिमा खास ठरणार आहे. दोघांमधले गैरसमज दूर झालेत. त्यामुळे गौरीही जयदीपासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप-गौरीसाठीही वटपौर्णिमा खास ठरणार आहे. दोघांमधले गैरसमज दूर झालेत. त्यामुळे गौरीही जयदीपासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे. sakal
आई कुठे काय करते मालिकेतील संजना आणि  अनिरुद्ध यांनीही वटपौर्णिमा साजरी केली. संजना या सर्व प्रथा परपरांना कायम बगल देते. पण यंदा मात्र तिने हा सण आवडीने साजरी केला.
आई कुठे काय करते मालिकेतील संजना आणि अनिरुद्ध यांनीही वटपौर्णिमा साजरी केली. संजना या सर्व प्रथा परपरांना कायम बगल देते. पण यंदा मात्र तिने हा सण आवडीने साजरी केला. sakal
तर याच मालिकेतील अभि आणि अनघा यांचे नुकतेच लग्न झाले. त्याचा हा पहिलाच वटपौर्णिमेचा सण आहे.
तर याच मालिकेतील अभि आणि अनघा यांचे नुकतेच लग्न झाले. त्याचा हा पहिलाच वटपौर्णिमेचा सण आहे. sakal
पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकी तर हटके अंदाजात वटपौर्णिमा साजरी करणार आहे. खरतर तिने वटपौर्णिमेचं व्रत करु नये म्हणून युवराजच्या आईने खूप प्रयत्न केले आहेत. पण हार मानेल ती पिंकी कसली युवराजसकट त्याच्या गाडीलाच पिंकी फेरे मारुन व्रत पूर्ण करणार आहे.
पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकी तर हटके अंदाजात वटपौर्णिमा साजरी करणार आहे. खरतर तिने वटपौर्णिमेचं व्रत करु नये म्हणून युवराजच्या आईने खूप प्रयत्न केले आहेत. पण हार मानेल ती पिंकी कसली युवराजसकट त्याच्या गाडीलाच पिंकी फेरे मारुन व्रत पूर्ण करणार आहे. sakal
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या वटपौर्णिमेच्या भागात नेहा आणि यश आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. यावेळी यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभुदे अशी प्रार्थना करतो.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या वटपौर्णिमेच्या भागात नेहा आणि यश आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. यावेळी यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभुदे अशी प्रार्थना करतो.sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com