राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आज डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई ते कल्याण डोंबिवली रस्त्याने प्रवास करणे म्हणजे वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि वेळेचा दुरुपयोग टाळण्यासाठी अमित यांनी मुंबई ते डोंबिवली लोकलने प्रवास केला.
आगामी निवडणुका लक्षात घेता नाशिक, पुणे नंतर मनसेने कल्याण डोंबिवलीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.
कल्याण डोंबिवलीतील शाखा अध्यक्षांच्या भेटी घेण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर, शिरीष सावंत,आमदार राजू पाटील यांसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित आहेत.
अमित ठाकरे यांनी दादर ते डोंबिवली हा कर्जत जलद लोकलच्या फस्ट क्लासने प्रवास केला. 11.30 च्या दरम्यान ते डोंबिवलीत आले.
कल्याण ग्रामीण भागातील कुशाला हॉटेल येथे त्यांची प्रथम बैठक होती. डोंबिवली स्टेशन ते कुशाला हॉटेल बैठक स्थान गाठण्यासाठी त्यांना मानपाडा रस्ता, कल्याण शीळ रोड मार्गे यावे लागले.
मनसे नेते अमित ठाकरे व मुंबईतील बडे नेते असल्याने त्यांच्यासाठी स्पेशल आगरी पद्धतीचे जेवण ठेवण्यात आले होते.
यामध्ये चिकन, मटण, मासे तांदळाची भाकरी आणि इतर पदार्थ होते.जेवण बनवण्यासाठी मनसेने खास कुक बोलवले होते.
खड्डयांच्या प्रश्नावरुन अमित ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेविरोधात रान उठवलं आहे.
"खड्ड्यांमुळे आज रस्तेमार्गाने कल्याण-डोंबिलवीत पोहोचायला दोन ते अडीच तास लागतात. लोकंच निवडणुकीच्या वेळी आता बोलतील. लोक बघतायत. प्रवास करताना दररोज त्रास सहन करतायत. एका पक्षाच्या हातात २५ वर्ष सत्ता दिली. पण त्यांना चांगले रस्तेपण बांधता आले नाहीत. हे लोकांना कळतय. नाशिकचे रस्ते तुम्ही आताही जाऊन बघू शकता" असे अमित ठाकरे म्हणाले.
बैठकीत व्यासपीठावर पक्षातील मोठया नेत्यांना प्रथम स्थान देत अमित यांनी स्वतः एका कोपऱ्यातील खुर्ची पकडली. त्यांच्या या स्वभावाचे मनसे पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.