मुंबईमध्ये आज पाच मजली ईमारत कोसळली आणि त्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सात जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अशी माहिती बीएमसीने दिली असुजन हि इमारत नक्की कशामुळे कोसळली याबाबत अजून अस्पष्टता आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरु अजूनही सुरु आहे. (छायाचित्र : विजय बाटे)
मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील बेहराम नगर परिसरात एक पाच मजली इमारत संध्याकाळच्या सुमारास अचानक कोसळली.
घटनास्थळी बीएमसीच्या अधिकाऱ्यांसह अग्निशमन दल आणि रूग्णवाहिका दाखल झाल्या असून, बचावकार्यदेखील युद्धपातळीवर सुरू आहे.
कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 7 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
चौघा जणांना व्ही. एन. देसाई तर, दोघा जणांना बांद्रा येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.