Nashik Rangpanchami 2023 : रहाड संस्कृतीसह नाशिककरांनी लुटला रंगपंचमीचा आनंद; पाहा Photos
Nashik Rangpanchami 2023 : महाराष्ट्रभर रंग खेळून किंवा एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली जाते, नाशिक मध्ये मात्र अत्यंत वेगळ्या पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाते. ती म्हणजे रहाडील धब्बा, पेशवेकालीन ही परंपरा आगदी वेगळी आहे. साधारणतः 12 बाय 12 फूट आणि तितकीच खोली असलेला रंगाने भरलेला हौद, आणि त्यात उडी म्हणजेच धब्बा. चौकाचौकात रहाडी वेगवेगळ्या रंगाने भरलेल्या असतात. त्यात धब्बा मारण्यास तरुणाईची झालेली मोठी गर्दी. रंगाच्या पाण्याने भरून वाहणारे रस्ते, गल्लोगल्ली पाण्याचे कारंजे, सर्व शहरभर मोठा उत्साह होता. चला तर या उत्साह अन् आनंदी क्षणांची क्षणचित्रे पाहुया...
नाशिकमध्ये पेशवे काळापासून रंगपंचमीला रहाड खेळली जाते..
या रहाडीत नागरिक डुबकी मारतात अन् रंगात न्हाऊन निघतात..
नाशिक शहरात रहाडीतील पाणी रंगीत करण्यासाठी नैसर्गिकरित्या रंग तयार करण्यात येतो. कुठल्याही केमिकलयुक्त रंगाचा वापर केला जात नाही हे या परंपरेची वैशिष्ट्य आहे.
रहाडीत डुबकी मारण्यासाठी नाशिककर मोठी गर्दी करतात...
रहाडीसह शहरातील विविध भागांत रेन डान्सचा देखील नाशिककरांनी आनंद लुटला...
रंगपंचीला गोदाघाटावर मोठी गर्दी जमा झाली होती.
Nashik Rangpanchami 2023
रंगपंचमीला रेनडान्समध्ये संगीताच्या तालावर तरुणाई थिरकली...
Nashik Rangpanchami 2023
Nashik Rangpanchami 2023
Nashik Rangpanchami 2023
Nashik Rangpanchami 2023
Nashik Rangpanchami 2023