Navratri 2021: हिंदू धर्मामध्ये नवरात्री उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. पंचागानुसार यावर्षी शारदीय नवरात्री उत्सव 7 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरू होईल आणि 15 ऑक्टोबरला शुक्रवारी समाप्त होईल. नवरात्री उत्सवादरम्यान नऊ दिवस आदीशक्तीच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पुजा केली जाते आणि वेगवेगळ्या पध्दतीने नैवेद्य दाखविला जातो. नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीला नऊ वेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची आरधना केली जाते. चला, जाणून घेऊ या नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंग आणि कोणत्या देवीची पूजा करतात.
पहिला दिवस :
नवरात्रीच्या पहिल्यादिवशी दुर्गामातेचे प्रथम रुप माता शैलपूत्रीची पुजा केली जाते. या दिवशी देवीला पिवळ्या रंगांची साडी नेसवून तिची पूजा-अर्चना केली जाते.
दुसरा दिवशी :
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गामातेचे दुसरे रुप माता ब्रम्हचारिणीची पुजा केली जाते. या दिवशी देवीला हिरव्या रंगांची साडी नेसवून देवीची आरधना केली जाते.
तिसरा दिवस :
नवरात्रीमध्ये तिसऱ्या दिवशी दुर्गामातेचे तिसरे रुप चंद्रघंटाचे पुजा केली जाते. यादिवशी देवीला राखाडी रंगांची साडी नेसवली जाते.
चौथा दिवस :
नवरात्रीमध्ये चौथ्या दिवशी दुर्गामातेचे चौथे रुप कुष्मांडाची पुजा केली जाते. यादिवशी देवीला नारंगी रंगांची साडी नेसवली जाते.
पाचवा दिवस :
नवरात्रीमध्ये पाचव्या दिवशी दुर्गामातेचे पाचवे रुप स्कंदमाताची पुजा केली जाते. यादिवशी देवीला पांढऱ्या रंगांची साडी नेसवली जाते.
साहवा दिवस
नवरात्रीमध्ये साहव्या दिवशी दुर्गामातेचे सहावे रुप कात्यायनीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला लाल रंगांची साडी नेसवली जाते.
सातवा दिवस
नवरात्रीमध्ये सातव्या दिवशी दुर्गामातेचे सातवे रुप कालरात्रिची पुजा केली जाते. यादिवशी देवीला निळ्या रंगांची साडी नेसवली जाते.
आठवा दिवस
नवरात्रीमध्ये आठव्या दिवशी दुर्गामातेचे आठवे रुप महागौरीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला गुलाबी रंगांची साडी नेसवली जाते.
नववा दिवस
नवरात्रीमध्ये नवव्या दिवशी दुर्गामातेचे नववे रुप सिद्धिदात्रीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला जांभळ्या रंगांची साडी नेसवली जाते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.