खरीप पिकांना जीवदान, शेतकऱ्यांना दिलासा 

सोमवार, 29 जून 2020

कसबे तडवळे (जि. उस्मानाबाद) : कसबे तडवळे परिसरात सोमवारी (ता. २९) दुपारी तासभर मुसळधार पाऊस झाल्याने शिवारातील नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले. पावसाचे पाणी साचल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले होते. या दमदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळाला आहे. परिसरात मृग नक्षत्राच्या सुरवातीला दोनवेळा जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाफसा होताच पेरणीला सुरवात केली होती. गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच या शिवारात खरिपाच्या पेरण्या मृग नक्षत्रात आटोपल्या होत्या. या शिवारात सोयाबीनची पेर सर्वाधिक असते. 