PHOTO I लोकराजा राजर्षी शाहूंना 100 कलाकारांचे अनोखे अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकराजा राजर्षी शाहूंना 100 कलाकारांचे अनोखे अभिवादन

kolhapur

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज १०० चित्रकार, शिल्पकार कला सादरीकरणातून राजर्षी शाहूंना मानवंदना दिली. शाहू मिल परिसरात मोठ्या हॉलमध्ये एका छताखाली सर्व कलाकारांनी एकत्र हा कलाविष्कार साकारला. छत्रपती शाहू महाराज यांनी आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, बाबूराव पेंटर, भाई माधवराव बागल अशा अनेक दिग्गज चित्रकार, शिल्पकारांना महाराजांनी राजाश्रय दिला. दरम्यान, शंभर कलाकारांकडून एकाचवेळी राजर्षींना अभिवादन करण्यात आले. हे फोटो टिपलते 'सकाळ'चे छायाचित्रकार मोहन मेस्त्री यांनी..

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी नऊला १०० चित्रकार, शिल्पकार कला सादरीकरणातून राजर्षी शाहूंना मानवंदना दिली.

शाहू मिल परिसरात मोठ्या हॉलमध्ये एका छताखाली सर्व कलाकारांनी एकत्र हा कलाविष्कार साकारला.

छत्रपती शाहू महाराज यांनी आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, बाबूराव पेंटर, भाई माधवराव बागल अशा अनेक दिग्गज चित्रकार, शिल्पकारांना महाराजांनी राजाश्रय दिला.

या मातब्बर कलाकारांनी कलासाधना करून एक स्वतंत्र अशी कोल्हापूर स्कूल शैली निर्माण झाली. हीच परंपरा अखंडित ठेवणारे कलाकार शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी शाहू मिलमध्ये एकत्र आले.

यात १०० ज्‍येष्ठ आणि नामवंत चित्रकार, शिल्पकार सहभागी झाले होते. या उपक्रमाचे उद्‌घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून, नागरिकांना ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी खुली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे.

या उपक्रमासाठी कॅमल कंपनीचे प्रायोजकत्व मिळाले असून, सर्व कलाकारांना कॅनव्हास व रंग कॅमलने दिले आहेत.

दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, कला निकेतन कला महाविद्यालय, कला मंदिर कला महाविद्यालय, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, रंग बहार, कलासाधना यांच्यासह मान्यवर चित्रकार, शिल्पकार याच्या सहभागातून हा उपक्रम होत आहे. या चित्राचे प्रदर्शन कृतज्ञता पर्वात शाहू मिल परिसरात होणार आहे.

go to top