- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
PHOTO : रक्षाबंधनाच्या सुट्टीत भावा-बहिणींच्या सहलीसाठी उत्तम ठिकाणे


जे भाऊ आणि बहिणी कॉलेज आणि नोकरीमुळे घरापासून दूर राहतात आणि लहानपणासारखा एकमेकांसोबत वेळ घालवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी 2022 हे वर्ष खास आहे. यावेळी तुम्हाला रक्षाबंधनाला चार दिवस सुट्टी मिळणार आहे. अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहिणी सहलीला जाऊ शकतात.

११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. हा दिवस सुट्टीचा असतो. १२ ऑगस्ट वगळता १३ आणि १४ ऑगस्टला शनिवार व रविवार आणि १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असते. अशा स्थितीत तुम्हाला रक्षाबंधनाला चार दिवस सुट्टी मिळत आहे. जे अनेक दिवस सुट्टी घेऊन सहलीला जाण्याची वाट पाहत होते, तेही ऑगस्टमधील या चार दिवसांच्या सुट्टीची संधी घेऊन फिरायला जाऊ शकतात.

ऋषिकेश रक्षाबंधन ते स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीत तुम्ही उत्तराखंडमधील कोणत्याही हिल स्टेशनला भेट देऊ शकता. कमी पैशात तुम्ही अध्यात्म, धर्म आणि साहस या तिन्ही गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. भाऊ-बहिणी आपल्या वडीलधार्यांसह सहलीला जात असतील तर ते उत्तराखंडमधील ऋषिकेशला जाऊ शकतात. इथल्या मंदिरांना भेट देण्याव्यतिरिक्त, तुम्ही रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग, माउंटन बाइकिंग, वॉटरफॉल ट्रेकिंग आणि फ्लाइंग फॉक्सचा आनंद घेऊ शकता. संध्याकाळी, तुम्ही कुटुंबासह गंगेच्या काठावर आरतीमध्ये सामील होऊ शकता.

उदयपूर, राजस्थान कुटुंबासह प्रवास करण्यासाठी राजस्थानमधील उदयपूर हा एक चांगला पर्याय आहे. उदयपूरची सहल एक अद्भुत अनुभव देईल. उदयपूरला तलावांचे शहर म्हटले जाते, जिथे तुम्हाला खूप सुंदर तलाव, राजवाडे पाहायला मिळतात. हे ठिकाण पर्यटकांचे आवडते आहे. येथे तुम्ही नौकाविहार करू शकता. तुम्ही इथल्या स्थानिक जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही खरेदीचा आनंद घेऊ शकता.

काश्मीर निसर्ग सौंदर्य आणि प्रत्येकाचे आवडते पर्यटन स्थळ काश्मीरला रक्षाबंधनाच्या चार दिवसांच्या सुट्टीत कुटुंबासह भेट देणे उत्तम आहे. या रक्षाबंधनाला कुटुंबासह पृथ्वीवरील स्वर्ग प्रवासाचा आनंद घ्या. चार दिवसांच्या सुट्टीत तुम्ही काश्मीरमधील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. सुंदर तलाव, हिरवळ, बागा पाहण्यासोबतच तुम्ही इथल्या स्थानिक बाजारपेठेतही फिरू शकता. या हंगामातील काश्मीरचा प्रवास संस्मरणीय आणि मजेशीर असेल. खर्चही कमी होईल.

तवांग जर तुम्हाला ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल आणि सुंदर दृश्यांमध्ये शांत वातावरणात फिरण्यासाठी जागा निवडत असाल तर तुम्ही तवांगला जाऊ शकता. तवांग हे भारतातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकिंग ठिकाणांपैकी एक आहे. चार दिवसांत तुम्ही तवांगच्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता. येथे तुम्ही तवांग वॉर मेमोरियल, तवांग मठ, सेला पास, बाप टेंग कांग आणि गोरोचन शिखर इत्यादींना भेट देऊ शकता. तुम्ही इथे बजेटमध्ये प्रवास करू शकता.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.