PHOTO : पितृपंधरवड्यात काकस्पर्शासाठी आसूसले नाशिककर

Kavghas
Kavghasesakal
Updated on

नाशिक : पितृपंधरवडा सुरु असल्याने आपल्या पुर्वजांना घास ठेवण्याची परंपरा आहे. रामकुंड, घारपुरेघाट किंवा आपल्या घराच्या छतावर कावघास ठेवला जातो. जेणे करुन या घासास कावळा स्पर्श करेल. दिवसेंदिवस शहरात कावळ्यांची संख्या कमी झाल्याने भाविक तो घास थेट स्मशानभुमीत नेत आहेत. पंचवटी स्मशानभुमी लगत झाडे भरपुर असल्याने तेथे कावळ्यांची संख्या ही बरी आहे. त्यामुळे बरेच भाविक घास घेऊन पंचवटी स्मशानभुमीत जातात. व तेथे कावळ्यासाठी घास ठेवतात. कधी काकस्पर्श लगेच होतो तर काही वेळा ताटकळत बसावे लागते. पुर्वजांना आवडत्या गोष्टींचा नैवद्द ठेवला जातो. त्या ठिकाणी गरीब मुलेही अन्नाच्या व आवडत्या वस्तुंच्या शोधात येत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com