sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi: मोदी दरवर्षी कारगिलमध्ये सैनिकांसोबत साजरी करतात दिवाळी

दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात दुर्गम भाग असलेल्या कारगिलमध्ये गेले आहेत. पंतप्रधान मोदी करगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. 

देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आजच्या या आनंदाच्या क्षणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल येथे जात भारतीय जवानांचे मनोबल वाढवले.

यावेळी त्यांनी रशिया युक्रेन युद्धादरम्यान कशा पद्धतीने भारतीय तिरंगा नागरिकांचे सुरक्षा कवच म्हणून उदयास आले यााबाबत सांगितले. सैनिकांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, माझं भाग्य की मला तुमच्यासोबत सीमेवर गेल्या अनेक वर्षापासून दिवाळी साजरी करण्याची संधी मिळत आहे.

कारगिलमध्ये भारतीय सैन्याने दहशतवादाचा मुकाबला करत देशाचे रक्षण केले होते. हा विजय देशासाठी एकप्रकारे दिवाळीचा उत्साह साजरा करण्यासारखाच होता. कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही.

कारगिलने प्रत्येक वेळी भारताचा विजय केला आहे. हे भारताच्या विजयाचं प्रतीक आहे, दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा उत्सव आहे त्यामुळे मी कारगिलच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही असं म्हणत नरेंद्र मोदींनी कारगिलच्या विजयाच्या आठवणींना उजाळा दिला.

काही महिन्यांपूर्वी जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले त्यावेळी तेथे अडकलेल्या भारतीयांसाठी तिरंगा कसा संरक्षक कवच बनला हे सर्वांनी पाहिले.

आज भारत अंतर्गत आणि बाह्य शत्रूंसोबत आघाडी घेत असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. दहशतवाद, नक्षलवाद, अतिरेकी कारवायांचे विचार मुळापासून नष्ट केली जात असून, आज देशहिताचे मोठे निर्णय वेगाने घेतले जात असल्याचे ते म्हणाले.