PHOTO - सांगलीला वळीवाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

शासकीय व खासगी कार्यालयांतील व्यवहारांसह एकूणच जीवनमान विस्कळीत झाले.
rain sangli
rain sangliesakal
Updated on
Summary

जिल्ह्यात काल सायंकाळी 'ग्रॅंड एंट्री' केलेल्या वळीवाने रात्री तळ ठोकला आणि आज दिवसभर धिंगाणा घातला. वळीवाने धुवून काढले. त्याने उन्हाळा वाहून गेलाच, शिवाय मे महिन्यात ओढे भरून वहायला लागले. (Rain Update Sangli) सांगलीतील पावसाचे छायाचित्र टिपलेत 'सकाळ'चे उल्हास देवळेकर यांनी...

सांगली शहरातील विस्तारीत भागात तळी साचली, दलदल झाली, चौकांत पाणी साचले. बाजार कोलमडला.
सांगली शहरातील विस्तारीत भागात तळी साचली, दलदल झाली, चौकांत पाणी साचले. बाजार कोलमडला. esakal
सोबतच, यंदाच्या पावसाळ्यात आणखी मोठे संकट येईल की काय, या भितीने नदीकाठाला घाम फोडला.
सोबतच, यंदाच्या पावसाळ्यात आणखी मोठे संकट येईल की काय, या भितीने नदीकाठाला घाम फोडला.esakal
गुरुवार, शुक्रवार पाऊस पडणार हा अनुमान होताच, मात्र असा अजब पाऊस पडेल, अशी अपेक्षाच नव्हती.
गुरुवार, शुक्रवार पाऊस पडणार हा अनुमान होताच, मात्र असा अजब पाऊस पडेल, अशी अपेक्षाच नव्हती. esakal
मे महिन्यात वळीव येतोच, तास-दोन तास ढगांचा गडगडात होतो, वीजा चमकतात, पाणी पाणी होते आणि तो निघून जातो.
मे महिन्यात वळीव येतोच, तास-दोन तास ढगांचा गडगडात होतो, वीजा चमकतात, पाणी पाणी होते आणि तो निघून जातो. esakal
यावर्षी पावसाचा मूड वेगळा आहे. सलग दोन दिवस मुक्काम ठोकून तो कोसळत आहे. हस्त नक्षत्रात ज्या पद्धतीने तो तळ ठोकतो, तशीच अवस्था असल्याचे जुने जाणकार सांगत आहेत.
यावर्षी पावसाचा मूड वेगळा आहे. सलग दोन दिवस मुक्काम ठोकून तो कोसळत आहे. हस्त नक्षत्रात ज्या पद्धतीने तो तळ ठोकतो, तशीच अवस्था असल्याचे जुने जाणकार सांगत आहेत. esakal
मे महिन्यात वळवाचा पाऊस अशा पद्धतीने पडताना आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, ही ज्येष्ठांची प्रतिक्रिया बोलकी आहे.
मे महिन्यात वळवाचा पाऊस अशा पद्धतीने पडताना आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, ही ज्येष्ठांची प्रतिक्रिया बोलकी आहे.esakal
जत तालुक्यात अतिवृष्टीसारखी परिस्थिती झाली आहे. ओढ्यांचे पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक रस्ते काहीकाळ बंद पडले होते.  
जत तालुक्यात अतिवृष्टीसारखी परिस्थिती झाली आहे. ओढ्यांचे पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक रस्ते काहीकाळ बंद पडले होते.  esakal
जतमध्ये अतिवृष्टी, सांगली शहरांत मुसळधार आणि त्याचवेळी जिल्हाभर एकावेळी वळीवाची हजेरी, असे अजब रसायन पहायला मिळाले.
जतमध्ये अतिवृष्टी, सांगली शहरांत मुसळधार आणि त्याचवेळी जिल्हाभर एकावेळी वळीवाची हजेरी, असे अजब रसायन पहायला मिळाले.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com