धनंजय महाडिकांना राज्यसभेचा गुलाल; जाणून घ्या मुन्ना महाडिकांच्या बद्दल खास गोष्टी

राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात धनंजय महाडिकांची बाजी
rajya sabha election result 2022 dhananjay mahadik
rajya sabha election result 2022 dhananjay mahadiksakal
Updated on

राज्यसभा निवडणुकीचा निकाल तब्बल 9 तासांचा सस्पेन्स संपला आहे. भाजपचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात उतरले होते. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार रिंगणात उतरवलं होतं, आणि भाजपकडूनही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना यांना उमेदवारी देण्यात आली होती. राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात भाजपनं बाजी मारली. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मोठा धक्का बसलाय आहे.

धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातून राजर्षी शाहू महाविद्यालयातून बीकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. कुस्ती आणि बॉक्सिंग यात ते राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेले आहेत. छात्र नेता म्हमून त्यांनी कॉलेज आणि विद्यापीठ निवडणुकांत निर्णायक भूमिका बजावल्या आहेत.

धनंजय महाडिक यांचे वडील भीमराव महाडिक यांच्या मृत्यूनंतर ते व्यापारात आले आणि त्यांच्या वडिलांचा उद्योग समूह त्यांनी सांभाळण्यास सुरुवात केली. 15 हून अधिक वर्षे ते सामाजिक कार्यात आहेत.

धनंजय महाडिक यांनी 2004, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. 2004 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती पण राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिकांकडून त्यांचा पराभव झाला होता.

2009 साली त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र त्यावेळी महाडिकांना वगळून छत्रपती संभाजीराजेंना राष्ट्रवादीने तिकिट दिले होते. धनंजय महाडिकांना थांबण्यास सांगण्यात आले. तर सदाशीव मंडकि यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

2009 साली महाडिक यांनी दक्षिण कोल्हपूर विधानसभेतून निवडणूक लढवली होती. २०१४ साली त्यांना राष्ट्रवादीचे खासदारकीचे तिकिट देण्यात आले. त्यावेळी ते पहिल्यांदा खासदार झाले.

2019 साली ही त्यांनी निवडणूक लढवली पण शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्र्वादीचे हसन मुश्रीफ आणि राजेंद्र यट्रावकर हे मंत्री आहेत. त्यामुळे कोल्हापुरात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.

2019 साली झालेल्या विधानसभेत कोल्हापुरात भाजपाला यश मिळालं नव्हतं. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनाही कोथरुड, पुण्यातून उमेदवारी देण्यात आली होती. कोल्हापूरचे राजकारण हे सहकारावर अवलंबून आहे. त्यामुळे महाडिकांच्या रुपाने भाजपाला तिथे स्थानिक नेतृत्व देण्याचा प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com