पिंपरी चिंचवड शहरात चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोमवार, 13 जानेवारी 2020

पिंपरी - रविवार सुटीचा दिवस. तरीही दप्तर पाठीवर टाकून मुलांची पावले शाळांकडे वळत होती. परंतु तासिकाप्रमाणे नोटबुक, पुस्तकांऐवजी त्यात होते चित्र रंगविण्याचे साहित्य. पॅड, कंपास पेटी, कलर बॉक्‍स, खाऊचा डबा आणि पाण्याची बोटल. सकाळचे कोवळे ऊन अंगावर झेलत. काहींनी शाळेचा गणवेश परिधान केलेला, तर काहींना आवडीचा ड्रेस. काही मित्रांसोबत तर काही मम्पी-पपांसोबत. कारण, त्यांना ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सहभाग घ्यायचा होता.