Photo: 'आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा रामराम घ्यावा'; असा रंगला तुकाराम बीज सोहळा

Tuesday, 30 March 2021

देहू (पुणे) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचे ३७३ वे वर्ष आहे. परंपरेनुसार आणि सरकारच्या आदेशाचे पालन करत ५० जणांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. मंदिरासमोर भजनी मंडप उभारण्यात आला असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली. त्यानंतर देऊळवाडा ते वैकुंठस्थान मंदिराकडे पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी या परिसरात राहणाऱ्या देहूकरांनी दुरूनच पालखीचे दर्शन घेतले.  

संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देहू नगरपंचायतीच्या हद्दीत दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे देऊळवाडा आणि देहू गावाला छावणीचे स्वरुप आले होते. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)