sakal

बोलून बातमी शोधा

सात हजार पावले चाला, आयुष्य वाढेल; नवीन अभ्यासातून दावा

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हेल्दी आणि फिट राहणं जवळजवळ कठीणच झालं आहे. दीर्घ आयुष्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल असणे अत्यंत महत्वाचे आहे. खाण्याच्या सवयी आणि अस्वस्थ सवयींचा थेट परिणाम एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर होतो. एका नवीन अभ्यासानुसार, दररोज सात हजार स्टेप्स चालल्याने लहान वयात मृत्यूचा धोका 50 ते 70 टक्के कमी होतो. हा अभ्यास जामा नेटवर्क ओपन जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे.

 फिजिकल अॅक्टिविटी एपिडेमायोलॉजिस्ट आणि अभ्यास प्रमुख लेखिका अमांडा पलुच यांनी सांगितले की, चालण्यामुळे किंवा 10 हजारांपेक्षा जास्त स्टेप्स चालण्यामुळे कोणत्याही अतिरिक्त फायद्याचा पुरावा मिळाला नाही.

 त्यांनी जपानी पेडोमीटरसाठी सुमारे एक दशक जुन्या मार्केटिंग कॅम्पेनचा भाग म्हणून 10 हजार स्टेप्स चालण्याचे वर्णन केले.

यासाठी संशोधकांनी कोरोना आर्टरी रिस्क डेव्हलपमेंट इन यंग अॅडल्ट (CARDIA)अभ्यासातून डेटा घेतला आहे, जो 1985 मध्ये सुरू झाला होता आणि संशोधन अजूनही सुरु आहे.

2006 मध्ये 38 ते 50 वयोगटातील सुमारे 2,100 स्वयंसेवकांना एक्सेलेरोमीटर बसवण्यात आले होते.

त्यानंतर सुमारे 11 वर्षे त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवले गेले.

यानंतर, 2020-21 मध्ये त्याच्या डेटाचे विश्लेषण केले गेले आणि सहभागी स्वयंसेवकांना तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले.

पहिला लो स्टेप्स वॉल्यूम (दररोज 7,000 पेक्षा कमी स्टेप्स), दुसरी मॉडरेट (7,000-9,000 स्टेप्स) आणि तिसरी उच्च (10,000 पेक्षा जास्त स्टेप्स).

अभ्यासाच्या आधारे, तज्ञांनी सांगितले की दररोज 7,000 ते 9,000 स्टेप्स चालणाऱ्या स्वयंसेवकांच्या आरोग्याला खूप फायदा झाला आहे.

परंतु ज्यांनी दररोज 10,000 पेक्षा जास्त स्टेप्स चालल्या त्यांच्या आरोग्याला कोणताही अतिरिक्त लाभ मिळाला नाही.

संशोधकांना असे आढळून आले की, जे लोक दररोज सरासरी 7,000 स्टेप्स चालतात त्यांना कोणत्याही कारणाने मृत्यूचा धोका 50 ते 70 टक्के कमी असतो.