सोयाबीन कुजले, कलिंगड नासले 

बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

परंडा (उस्मानाबाद) ः अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या तालुक्‍यातील भागात परतीच्या पावसाने सलग वीस दिवस हजेरी लावल्याने शेकडो हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कांदा, तूर, कलिंगड, ज्वारी, बाजरी, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या या भागात गेल्या वीस दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. दुर्गम भागात असलेल्या ताकमोडवाडी, उंडेगाव, चिंचपूर (बुद्रुक), सक्करवाडी, पांढरेवाडी, कुक्कडगाव, खंडेश्वरवाडी या भागांत मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने दररोज हजेरी लावली.

परंडा (उस्मानाबाद) ः अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या तालुक्‍यातील भागात परतीच्या पावसाने सलग वीस दिवस हजेरी लावल्याने शेकडो हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कांदा, तूर, कलिंगड, ज्वारी, बाजरी, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या या भागात गेल्या वीस दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. दुर्गम भागात असलेल्या ताकमोडवाडी, उंडेगाव, चिंचपूर (बुद्रुक), सक्करवाडी, पांढरेवाडी, कुक्कडगाव, खंडेश्वरवाडी या भागांत मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने दररोज हजेरी लावली. नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. सततच्या पावसामुळे शेतातील कांद्याचे पीक सडून गेले. भुईमूग, सोयाबीनचे नुकसान झाले आहे.