- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
या फळ-भाज्यांची विक्री होते लाखोंमध्ये; शेतीत आहे बक्कळ नफा


काळी लसूण काळ्या लसणीचा वास पांढऱ्या लसणीइतका उग्र नसतो; पण यात भरपूर पोषक तत्त्वे असतात. ताज्या, कच्च्या लसणीला ६० ते ९० दिवस उच्च तापमानात ठेवून आंबवल्यावर काळी लसूण तयार होते. काळ्या लसणीची चव आंबटगोड असते. या लसणीमुळे रक्ताभिसरण वाढते, कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाशी संबंधित आजार नाहीसे होतात.

लाल भेंडी हिरव्या भेंडीपेक्षा लाल भेंडी अधिक पौष्टिक असते. वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चच्या कृषितज्ज्ञांनी दोन वर्षांपूर्वीच ही भेंडी विकसित केली आहे. यात कॅल्शिअम आणि लोह मोठ्या प्रमाणवर असते.

बाम्बू तांदूळ बाम्बूच्या झाडाला फुले येत असल्यास समजून जावे की ते मरणार आहे. बाम्बूचा तांदूळ हा त्या झाडाचे मरणानंतरचे अवशेष असतो. बाम्बूच्या फुलामधून त्याची निर्मिती होते. हे तांदूळ १०० वर्षांत एक-दोन वेळाच पिकतात.

गुच्छी हा एक अळंबीचा प्रकार असून याची किंमत ३० हजार रुपये प्रतिकिलो असते. हिमालयात उगवणारी गुच्छी म्हणजे जगातील सर्वात महागडी अळंबी आणि देशातील सर्वात महागडी भाजी आहे. यात मोठ्या प्रमाणावर लोह असते. तसेच ड, ब जीवनसत्त्व आणि क्षारही असतात.

काळे टरबूज डेनसुक प्रजातीच्या टरबुजाला काळा टरबुज असेही म्हणतात. जपानच्या विशिष्ट भागातच याचे उत्पादन होते. वर्षभरात केवळ १०० काळे टरबूज पिकवले जातात. त्यामुळे हे टरबूज कोणत्याही दुकानात विक्रीसाठी ठेवले जात नाहीत. त्यांचा लिलाव होते. या टरबुजाचा सर्वाधिक महागडा लिलाव २०१९ साली झाला होता. एका टरबुजाला साडे चार लाख रुपये किंमत मिळाली होती.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.