राहुलच कॉंग्रेसचे अध्यक्ष- जयराम रमेश

पीटीआय
Friday, 17 June 2016

"कॉंग्रेस-भाजपतील फरक सांगा‘ 
लोकसभेत कॉंग्रेस खूपच अशक्त आहे. राज्यसभेतील संख्याबळही घटले आहे. तसेच काही राज्यातच पक्षाची सत्ता आहे, ती कठीण परिस्थितीत आहे. कॉंग्रेस हा 130 वर्षांचा देशातील सर्वांत जुना पक्ष आहे. मतदारांनी पक्षाला मत का द्यावे हे सांगण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेस आणि भाजपतील फरकही लोकांना सांगितला पाहिजे, असेही जयराम रमेश यांनी शेवटी सांगितले.

नवी दिल्ली : खरे पाहायला गेले, तर राहुल गांधी हेच आज पक्षाचे अध्यक्ष आहेत, मात्र तांत्रिकता पूर्ण करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी पक्षाने अध्यक्षपदाबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केले. 

बदलत्या भारताबरोबरच कॉंग्रेसनेही बदलण्याची गरज आहे, असे पीटीआयशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. रमेश म्हणाले, ""कॉंग्रेसला सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागत आहे. याचा विचार करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्षाला पोचण्याची आवश्‍यक्ता आहे. नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारतची जी घोषणा केली, त्याविषयी बोलताना ते म्हणाले, की कॉंग्रेससमोर आव्हान आहे हे मान्य करायला हवे. मात्र कॉंग्रेसची आजही देशात ताकद आहे. ही ताकद वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न व्हायला हवेत. 

आज कॉंग्रेससमोर जी आव्हाने आहेत, ती 1988 मध्येही होती. तेंव्हा सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. तेंव्हा मध्य प्रदेश आणि ओडिशा या दोन राज्यांतच कॉंग्रेस सत्तेवर होती. मात्र, लोकसभेत पक्षाचे बळ 140 होते. त्यानंतर सलग पंधरा वर्षे कॉंग्रेस केंद्रात सत्तेवर होती. कॉंग्रेस तेंव्हाही अडचणीत होती. मात्र पुढे त्यांनी काय करून दाखविले हे सर्वांना माहीत आहे. राहुल गांधी हे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्यावर पक्षबांधणीची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे चांगल्या कल्पना आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवायला हवी. 

कॉंग्रेसची प्रचार यंत्रणा तितकीशी प्रभावी नाही. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचायचे असल्यास व्यूहरचनेत बदल व्हायला हवा. अनेक मुद्दे असे आहेत, की त्यावर पक्षाने आपली भूमिका आक्रमकपणे मांडली पाहिजे. 
- जयराम रमेश, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते 

"कॉंग्रेस-भाजपतील फरक सांगा‘ 
लोकसभेत कॉंग्रेस खूपच अशक्त आहे. राज्यसभेतील संख्याबळही घटले आहे. तसेच काही राज्यातच पक्षाची सत्ता आहे, ती कठीण परिस्थितीत आहे. कॉंग्रेस हा 130 वर्षांचा देशातील सर्वांत जुना पक्ष आहे. मतदारांनी पक्षाला मत का द्यावे हे सांगण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेस आणि भाजपतील फरकही लोकांना सांगितला पाहिजे, असेही जयराम रमेश यांनी शेवटी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jairam Ramesh: New Congress President

फोटो गॅलरी