बनावट पावत्यांच्या अधारे कोट्यावधीची वाळू माफियांच्या घशात

बनावट पावत्यांच्या अधारे कोट्यावधीची वाळू माफियांच्या घशात
बनावट पावत्यांच्या अधारे कोट्यावधीची वाळू माफियांच्या घशात

जळगाव,  : शहरासह जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा सर्रास सुरू आहे. काही ठिकाणी बनावट पावत्यांच्या आधारे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात असल्याची बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी जळगाव शहर आणि तालुका पोलिस ठाण्यात अवैध गौण खनिज कारवाई संदर्भात अर्ज सादर केला होता. अर्जाच्या उत्तरा दाखल प्राप्त रॉयल्टी पावत्या आणि कारवाईची माहिती त्यांना देण्यात आली होती. प्राप्त शासकीय पावत्या बनावट असल्याची शंका आल्यावरून श्री. गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गौणखनिज आणि वन विभागाला पत्रव्यवहार करून माहिती मागितली होती. प्राप्त माहितीनुसार एकच पावती पुस्तक क्रमांकावर पोलिसांकडे वेगळी आणि गौणखनिज विभागाकडे वेगळ्या वाहनांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

प्रांताधिकारी धमकी प्रकरण 
गेल्या आठवड्यात प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांना वाळू कारवाई संदर्भात अज्ञात व्यक्तीने फोनवरून धमकी दिली होती. हे प्रकरणही याच बनावट पावत्यांशी निगडित असण्याची शक्‍यता वर्तवली जात असून बनावट पावत्या घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री, राज्यपाल, महसूल मंत्री यांच्यासह प्रशासनाला ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आलेली आहे. 

कोट्यवधीचा चुना 
बनावट पावत्यांच्या आधारे शासनाला रॉयल्टीपोटी आणि दंडापोटी मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून प्राप्त माहितीनुसार सहा वाहनांच्या कारवाई संदर्भात 1 लाख 20 हजार दंडाप्रमाणे 14 लाख 40 हजारांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. 

वाळू लपविण्यासाठी "कच'चा थर 
एका वाळूच्या डंपरमध्ये दोन ते चार ब्रास वाळू वाहतूक होते. वाळूची चोरटी वाहतूक करण्यासाठी भरलेल्या वाळूवर बारीक कच अंथरली जाऊन प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. 

कानळदा येथे अवैधसाठा 
कानळदा येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ 28 मेस पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात वाहनांनी भरमसाट वाळू आणून साठविल्याची तक्रार लाठी यांनी केली असून हा साठा जप्त करण्याची मागणी होत आहे. 

भुसावळात पकडले डंपर 
जिल्ह्यात शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत लॉकडाउनच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरूच आहे. भुसावळ तहसीलच्या अधिकाऱ्यांनी कुऱ्हा गावानजीक आज अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर (एमएच 19, झेड 8600) जप्त केले. 

पावत्या माझ्याकडून दिल्या जात नाही. त्या पावत्यांची चौकशी करू. पंचनामा तहसीलदार करतात. पंचनाम्यानंतर दंड वसूल होतो. त्यानंतर वाहन सोडले जाते. माझा मोबाईल माझ्या पतीचा आहे. रीतसर पावती आहे. 
- दीपमाला चौरे 
प्रांताधिकारी 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com