Jalgaon Accident News : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन 1 ठार | 1 killed in two wheeler head on accident jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Jalgaon Accident News : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन 1 ठार

Jalgaon Crime News : येथील भडगाव रोड भागातील महाराणा प्रताप चौकात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. (1 killed in two wheeler head on accident jalgaon news)

संजय रतन पाटील (वय ५८, रा. कोठली, ता. भडगाव) हे या अपघातात फेकले जाऊन डोक्याला मार लागल्याने जबर जखमी झाले होते. रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांनी जखमी संजय पाटील यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या अपघातात नाना सुखदेव बोबडे (वय ५८, रा. कोठली) व इमरान खान (वय २७, रा. भडगाव) हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पोलिस कर्मचारी प्रकाश पाटील तपास करीत आहेत.

मृत संजय पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून, गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या अपघाती मृत्यूने शोक व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaonaccident case