Latest Marathi News | भुसावळचे दहा नगरसेवक अपात्र; एकनाथ खडसेंना धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

भुसावळचे दहा नगरसेवक अपात्र; एकनाथ खडसेंना धक्का

जळगाव : भाजप (NCP) सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला, म्हणून पक्षांतर बंदी कायद्यानुसार भुसावळचे दहा नगरसेवक १८ डिसेंबर २०२१ पासून ते नगरपरिषदेच्या पुढील कार्यकाळासाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ही कारवाई केल्याने भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: शिवसेना संपवण्याचे काम पवार काका पुतण्यांनी केलं- रामदास कदम

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील त्यांच्या काही समर्थकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. १८ डिसेंबर २०२१ ला भुसावळ येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला होता. त्या वेळी दहा नगरसेवकांनी भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले होते. त्यामुळे पुष्पाबाई रमेशलाल बत्रा यांनी या दहा नगरसेवकांना अपात्र करावे, म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही कडील बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर सोमवारी (ता. १८) भुसावळच्या दहा नगरसेवकांना १८ डिसेंबर २०२१ ते नगरपरिषदेच्या पुढील कार्यकाळापर्यंत अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदारातर्फे ॲड. राजेंद्र राय, तर नगरसेवकांतर्फे ॲड. महेश भोकरीकर, ॲड. हरीश पाटील यांनी काम पाहिले.

हेही वाचा: "आदित्य तुझं वय काय, तू आमदारांना बोलतो काय?" रामदास कदमांचा संताप

असे आहेत अपात्र नगरसेवक

लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, ॲड. बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलजा नारखेडे.

Web Title: 10 Corporators Of Bhusawal Municipal Disqualified

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..