Latest Marathi News | चार गावातून एकाच रात्री 12 गुरे चोरीला; शेतकरी भयभीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

12 cattle were stolen from four villages in one night in jalgaon district

चार गावातून एकाच रात्री 12 गुरे चोरीला; शेतकरी भयभीत

कजगाव (ता. भडगाव) : परिसरातील लोणपिराचे, बोदर्डे, कोठली व निंभोरा या चारही गावातून एकाच रात्री तब्बल बारा जनावरे चोरीस गेली. लोण येथील गावाला लागूनच असलेल्या शेडमधून व मोकळ्या जागी बांधलेली जनावरे वाहनात टाकून भामटे पसार झाल्याचा अंदाज लोण ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

रामकृष्ण मांगो पाटील यांची ऐंशी हजार रुपये किमतीची बैलजोडी व तीस हजार रुपये किमतीची गाय चोरून नेली आहे तर रघुनाथ शायसिंग पाटील यांची एक गाय व दोन वासरे असे तीन जनावरे (अंदाजे एकलाख रुपये किमतीचे पशुधन) तेथून चोरी झाले आहेत. तर बोदर्डे येथील सुनील प्रल्हाद पाटील यांचेही एक पशुधन व कोठली येथील भिकन संतोष पाटील या शेतकऱ्यांचे तीन पशु तसेच निंभोरा येथील माधवराव लुडू पाटील या शेतकऱ्याची दोन जनावरे असे चार गावातून तब्बल बारा पशुधन चोरी झाले आहेत.

हेही वाचा: मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी 'हे' उपाय करा; 5 पाने पडतील उपयोगी

चारही गावातील शेतकऱ्यांचे मिळून तब्बल चार ते पाच लाख रुपये किमतीचे पशुधन चोरी झाल्याच्या घटनेने पशुपालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, पोलिस कर्मचारी प्रकाश गवळी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. भडगाव पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, पोलिस कर्मचारी नरेंद्र विसपुते, प्रकाश गवळी तपास करीत आहेत, तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने पशुपालकांना जनावरे रस्त्याच्या कडेला न बांधता ती सुरक्षित ठिकाणी बांधावी तसेच आपल्या पशुधनाकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: तुमचा विजय देशासाठी प्रेरणादायी; राष्ट्रकुलमधील विजेत्यांशी पंतप्रधानांचा संवाद

Web Title: 12 Cattle Were Stolen From Four Villages In One Night In Jalgaon District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime NewsCattle