शेतीच्या बंधाऱ्यांसाठी 12 कोटींचा निधी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

12 crore sanctioned for agricultural dams

शेतीच्या बंधाऱ्यांसाठी 12 कोटींचा निधी मंजूर

चाळीसगाव (जि. जळगाव) : आ. मंगेश चव्हाण यांच्या अथक परिश्रमातून तालुक्यातील १९ सिमेंट बंधाऱ्यांसाठी १२ कोटींचा निधी नुकताच मंजूर झाला असून लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामुळे ३७८ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे.

चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सिमेंट बंधारे बांधकाम करणे अत्यंत गरजेचे आहे. असे लक्षात येताच आमदार चव्हाण यांनी सिमेंट बंधारे बांधकामासाठी सरकारकडे निधीची मागणी केली होती. अथक परिश्रमानंतर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तालुक्यातील १५ गावांना १९ सिमेंट बंधारे बांधकामासाठी १२ कोटी रुपयांचा निधी नुकतीच मंजूर झाला आहे. यामुळे आमदार चव्हाण यांचे शेतकरी वर्गाकडून आभार मानले जात आहे. यात सांगवी, बहाळ येथे प्रत्येकी ३ तसेच चांभार्डी, दसेगाव, राजदेहरे, कुंझर, रांजणगाव, कळमडू, पिंपळवाढ म्हाळसा, पाटणा, दडपिंप्री, पिंपरखेड, खडकी, डोणदिगर, खराडी येथे प्रत्येकी १ असे एकूण १९ सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम होणार आहे. यामुळे जवळपास ३७८ हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. तत्पूर्वी यासंदर्भातल्या निर्णयाचे पत्र महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ मार्फत ता. ११ मे २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठपुरावा करत याबाबतची जून महिन्यातच ई-निविदा देखील प्रसिद्ध झाल्याने लवकरच सदर कामांना सुरुवात होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: शाळा दुरुस्तीसाठी सेस निधी वापरण्यास बंदी

हेही वाचा: वरुणराजाच्या हजेरीनंतरही 3 तालुक्यात कमी पाऊस

Web Title: 12 Crore Sanctioned For Agricultural Dams Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..