Jalgaon Crime News : 18 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide Case

Jalgaon Crime News : 18 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या

Jalgaon News : शिरसोली (ता. जळगाव) येथील १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, एमआयडीसी पोलिसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पूजा सुधाकर बारी (रा. शिरसोली प्र. न.) असे मयत तरुणीचे नाव आहे.

शिरसोली येथील नबाबाई बारी या दुपारी अडीचच्या सुमारास कामावरून घरी आल्या. घरात शिरल्यानंतर त्यांना पुजा आढळून आली नाही. (18 year old girl committed suicide by hanging herself Jalgaon Crime News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शोध घेतला असता, छताच्या कडीला साडी बांधून पुजाने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहताच आजीने हंबरडा फोडला.

आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळवल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीसांना घटनेची माहिती दिली. तत्काळ पुजाला खाली उतरवून जळगाव शासकीय रुग्णालयात आणण्यात आले.

या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. तीच्या मागे आई, भाऊ, आजी असा परिवार आहे. तिने आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळाली नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.