Fake Currency Notes : सावधान! तुमच्याकडे नकली नोटा आल्यात का? 500 च्या नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

Fake Currency Notes
Fake Currency Notesesakal

अमळनेर : शहरात नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अमळनेर पोलिसांनी पैलाड भागात अटक केल्याची घटना शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

Fake Currency Notes
Nepal Currency Note : नेपाळच्या नोटांची छपाई आता नाशिक प्रेसमध्ये

पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना गोपनिय माहिती मिळाली, की पैलाड भागात दोन जण नकली नोटा चलनात आणत आहेत.

त्यांनी पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलिस कर्मचारी किशोर पाटील, दीपक माळी, शरद पाटील, रवींद्र पाटील, सिद्धांत शिसोदे, नीलेश मोरे यांच्या पथकाला ताबडतोब पैलाड भागात रवाना करून छापा टाकण्यास सांगितले असता त्यांनी भोला टेलर यांच्या दुकानाजवळ दोन्ही व्यक्ती संशयास्पद आढळून आले.

Fake Currency Notes
Currency Note Press : गांधीनगर मुद्रणालयाचे आधुनिकीकरण; 232 कोटींचा आराखडा तयार

त्यांच्या दोघांच्या खिशात १० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता त्यांचे नाव कैलास शिवराम भोया (वय २८, रा. इहदरी, ता. कफराड, जि. बलसाड) व दुसरा वसंत कालसिंग मुलकाशा (वय २३, रा. कावडझिरी, ता. धारणी. जि. अमरावती) त्यांच्याजवळ दुचाकी (एमएच २७, डीसी ७०५३) व दोन मोबाईल आढळून आले.

त्यांच्याजवळील दहा हजार रुपयांच्या नकली नोटा व दुचाकीसह मोबाईल असा एकूण एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे पुढील तपास करीत आहेत.

Fake Currency Notes
2000 Rupee Note : 2 हजारांच्या नोटा नेमक्या गेल्या तरी कुठं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com