Jalgaon Crime News : जळगावात पुन्हा दोन घरफोड्या | 2 burglaries in Jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

Jalgaon Crime News : जळगावात पुन्हा दोन घरफोड्या

Jalgaon News: शहरातील स्टेट बँक कॉलनीत किशोर मुरलीधर बागूल (वय ६३) १० ते १६ मेदरम्यान कुटुंबीयांसह गावी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. (2 burglaries in Jalgaon crime news)

घरातून दोन टीव्ही, ३५ हजारांची रोकड, चांदीचे शिक्के, पैंजण, हेडफोन, असा एकूण ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत किशोर बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उघड्या घरात चोरी

आव्हाणे (ता. जळगाव) येथील भागवत चावदास इंगळे (वय ६०) कुटुंब शनिवारी (ता. २०) रात्री उकाडा जाणवत असल्याने घराच्या हॉलचा दरवाजा उघडा ठेवला होता.

चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून ३४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, पाच हजारांची रोकड, असा ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत इंगळे कुटुंबीयांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. गुन्ह्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :Jalgaoncrimerobbery