Jalgaon News : एकाच गावात दोन बालविवाह रोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child marriage

Jalgaon News : एकाच गावात दोन बालविवाह रोखले

जळगाव : भुसावळ तालुक्यातील गावात एकाच दिवशी तीन विवाह होत असताना, चाईल्ड लाईन व पोलिसांच्या चौकशीत दोन बालविवाह (child marriage) आढळले. त्यानंतर पुढील कार्यवाही करून हे बालविवाह थांबविण्यात आले. (2 child marriages Prevented in same village jalgaon news)

चाईल्ड लाईन टीमला एकाच बालविवाहाची माहिती मिळाली होती. त्यानुसार चाइल्ड लाईन टीम सदस्यांनी बालकल्याण समितीच्या आदेशानुसार स्थळभेट केली. संबंधीत मुलीची कागदपत्रे तपासली असता, मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भुसावळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बालविवाह रोखण्यात आले.

त्यानंतर घटनास्थळी गावात तीन विवाह होत असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी दुसऱ्या एका विवाहस्थळी भेट देऊन वधु-वरांच्या वयाची पडताळणी केली असता, मुलगी अल्पवयीन असल्याचे आढळून आले. त्यामुळे तोही बालविवाह रोखण्यात आला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

पुढे तिसऱ्या विवाहस भेट दिली असता, वधु-वराचे पालक कागदपत्र घेऊन उपस्थित होते. त्यानुसार मुलगी व मुलगा वयात असल्याने चाईल्ड लाईन टीम व पोलीस अधिकारी यांनी विवाहास शुभेच्छा दिल्या.

यांचे विशेष प्रयत्न

या बालविवाह रोखण्याकामी चाईल्ड लाईन समन्वयक भानुदास येवलेकर, टीम सदस्य कुणाल शुक्ल, निलेश चौधरी, रंजना इंगळे, प्रसन्ना बागल यांनी काम पाहिले.

टॅग्स :Jalgaonchild marriage