
Jalgaon Crime News : चाळीसगावात दोन पिस्तूल जप्त
चाळीसगाव : येथील पोलिसांचे पथक हनुमानवाडी परिसरात गस्तीवर असताना दोघा अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्ट्यासह (Pistol) १० जिवंत काडतुसे मिळून आली.
याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (2 pistols seized in Chalisgaon jalgaon crime news)
पोलिसांनी सांगितले, की शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी योगेश बेलदार, दीपक पाटील, नीलेश पाटील व विनोद खैरनार हे मंगळवारी (ता. २१) सायंकाळी सातच्या सुमारास शहरात गस्त घालत होते. हनुमानवाडी येथे रेल्वे उड्डाण पुलावर अंकीत मोरे, अनिकेत मोरे व देव हिरे हे तिघे अल्पवयीन मुले पोलिसांना पाहून पळू लागली.
पोलिस त्यांच्या मागे धावताच त्यापैकी दोघांनी त्यांच्या हातातील वस्तू मंदिराच्या मागील बाजूस भिंतीलगत अंधारात टाकल्या व घरात पळ काढला. हे दोघे खुनाच्या गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक असल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
त्यामुळे पोलिसांनी मंदिराच्या मागील बाजूची पाहणी केली असता, भिंतीलगत दोन गावठी पिस्तूल, मॅक्झीनसह टाकलेल्या मिळून आल्या. याबाबत उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांना पोलिसांनी माहिती दिल्यानंतर घटनेचा पंचनामा करून दोन कट्टे, २ मॅक्झीन व १० जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली.
पळून गेलेल्या दोघा मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दीपक पाटील यांच्या फिर्यादीनुसार तिघा अल्पवयीन संशयितांच्या विरोधात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सुहास आव्हाड व कर्मचारी उज्ज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.