
Jalgaon Crime News : शहरातील 19 चोऱ्यांचा छडा लावत दोघांना अटक; रामानंद पोलिसांची कामगिरी
Jalgaon News : शहरातील वेगवेगळ्या भागांत झालेल्या १९ जबरी चोरीतील दोघी संशयितांना अटक करण्यात रामानंदनगर पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत दिली.
चोरट्यांकडून २६ तोळे सोने हस्तगत केले आहे. (2 thieves arrested for 19 theft in city jalgaon crime news)
२०१८ पासून जबरी चोरी करीत असलेला संशयित दत्तात्रय अमृत बागूल (वय ३९, रा. मोहाडी, जि. धुळे, ह.मु. जळगाव) आणि सुधाकर ऊर्फ जितेंद्र सुरेश महाजन (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी) यांना अटक केली होती.
त्या दोघांची सखोल चौकशी केली असता, दोघांनी तब्बल १९ जबरी चोरी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. यात रामानंदनगर ठाण्यात दाखल असलेले १५ गुन्हे, तसेच जिल्हापेठ पोलिस हद्दीतील २, तर एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील २, असे एकूण १९ जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश होता. जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पोलिसांनी २६ तोळे सोने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील, सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाले, हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, विजय खैरे, प्रवीण वाघ, राजेश चव्हाण, अतुल चौधरी, पोलिस शिपाई उमेश पवार, अनिल सोनवणे आणि दीपक वंजारी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही संशयितांना अटक केली.