Gas Cylinder Rate Hike : सर्वसामान्य नागरिक ‘गॅस’वर; दरात वर्षभरात 22.5 टक्के दरवाढ!

Gas Cylinder
Gas Cylinderesakal

Gas Cylinder Rate Hike : कोरोना महामारीनंतर आता सर्वसामान्यांवर महागाईचे संकट आले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचे दर सतत वाढत आहेत. (Jalgaon News) गॅस सिंलिडर तर अकराशे रूपयांवर गेल्याने गरिबांना पून्हा चुलीकडे वळावे असे वाटू लागले आहे. (22 5 percent increase in gas cylinder price in year jalgaon news)

विशेषत: कोरोनानंतर सिलिंडरच्या दरात वाढच होत आहे. केंद्र शासनाकडून मिळणारी सबसिडीही बंद झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना सिलिंडरचा खर्च झेपवत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन वर्षांत सातत्याने होत असलेल्या पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जेरीस आले आहेत. कोरोना संकटानंतर अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे दरवाढीपासून दिलासा मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र अत्यावश्यक असलेले इंधन आणि सिलिंडर दिवसेंदिवस महागच होत चालले आहे.

गेल्या काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलचे दर काही प्रमाणात स्थिर आहेत. मात्र, सिलिंडर दरवाढीचा मटका सुरू आहे. मार्च २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान घरगुती वापराचा सिलिंडर सुमारे २२.५ टक्क्यांनी (२०३ रूपयांनी) महागला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Gas Cylinder
Jalgaon Amrut Yojana : ‘अमृत’साठी येरे माझ्या मागल्या सुरुच! तयार रस्ता पुन्हा खोदला...

एक मार्च २०२२ ला घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर ९०२ रुपयांना मिळत होता. एक एप्रिल २०२३ला तो १ हजार १०५ रुपयांना झाला. भविष्यात ही किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान मात्र हे दर स्थिर होते.

"कोरोना संकट आल्यापासून आमच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही. मात्र, इंधन आणि किराणाच्या किमतीत मोठी वाढ झाली. महागाई वाढल्याने उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालणे कठीण झाले आहे. शासनाने सिलिंडर, इतर इंधनावर सवलत द्यावी. सिलिंडर एवढ्या लवकर हजार रुपयांच्या पुढे जाईल असे वाटले नव्हते." -सोनाली भावसार, गृहिणी

"गॅस सिलिंडरचे दर शासनाकडून ठरविले जातात. दर महिन्याला सिंलिडरच्या दराबाबत ठरविले जाते. स्थानिक पातळीवर त्याची किंमत ठरवली जात नाही. त्यामुळे दर किती असावे, हे आपल्या हातात नाही मात्र सिलिंडरची किंमत गरिबांना परवडणारी असावी याची काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात नागरिक चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळले आहेत."- अनंत पाठक, व्यवस्थापक धनश्री गॅस एजन्सी.

१३ महिन्यात १० वेळा बदलले दर

Gas Cylinder
Eknath Khadse : जिल्हा बँकेच्या सभेत शेतकरीहिताचे निर्णय : एकनाथ खडसे

गेल्या १३ महिन्यांत घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात १० वेळा बदल झाले आहेत. यात एकदाच घरगुती गॅसचे दर कमी झाले. जेव्हा-जेव्हा किमतीत बदल झाले तेव्हा दर ५० रुपयांच्या पटीत वाढले आहेत. त्यामुळे दिलासा मिळण्याऐवजी सर्वसामान्याची प्रत्येकवेळी निराशा झाली आहे.

असे वाढले दर (घरगुती- १४ किलो सिलिंडर)

तारीख--- दर

१ मार्च २०२२-- ९०२

१ मे २०२२---१००५

१ जून---९५२

१ जुल-- १०५५

१ आगस्ट-१०५५

१ आक्टोबर--१०५५

१ जानेवारी २०२३ --१०५५

१ मार्च-- ११०५

१ एप्रिल--११०५.

Gas Cylinder
Jalgaon News : सोसायटीमार्फतही मिळणार आता शेतकऱ्यांना कर्ज; जिल्हा बँकेत एकमताने निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com