Jalgaon Crime News : कारची हवा सोडून लांबविले 3 लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thieves removed the cash from the front seat of the same car.

Jalgaon Crime News : कारची हवा सोडून लांबविले 3 लाख

जळगाव : रायपूर कुसुंबा येथील किराणा दुकानदार माल घेण्यासाठी दाणाबाजारत कार घेऊन आले होते. त्यांच्या कारच्या मागील चाकाची हवा सोडून, तुमच्या कारची हवा निघतेय, असे म्हणत लक्ष विचलीत करून कारमधील तीन लाख पाच हजारांची रोकड असलेली बॅग लंपास (Looted) केली. (3 lakh looted from car by leaving air of car jalgaon crime news)

रायपूर कुसुंबा (ता. जळगाव) येथील किरणामाल विक्रेते संदीप परदेशी (वय ३५) मंगळवारी (ता. २१) मारुती इको (एमएच १९ सी झेड ९२२१) व्हॅन घेऊन माल खरेदीसाठी दाणाबाजारात आले होते. खरेदीसाठी परदेशी यांनी घरून ४ लाख ५ हजार रुपये आणले होते. बाजारात पोचल्यावर त्यांनी अमित ट्रेडर्स या व्यापाऱ्याला १ लाख रुपये दिले.

त्यानंतर त्यांनी नारळाचे पोते आणून व्हॅनमध्ये ठेवले. कार वळविण्यासाठी ते स्टेअरिंगवर बसले. त्यांच्या कारच्या मागे उभ्या भामट्याने त्यांना सांगितले, की तुमच्या कारच्या मागील चाकाची हवा कमी होत आहे. त्यामुळे परदेशी कारच्या खाली उरतले आणि चाक पाहण्‍यासाठी कारच्या मागे गेले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

त्याच भामट्याने कारच्या सीटशेजारी ठेवलेली ३ लाख ५ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक किसन नजन पाटील, विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली.

गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी बाजारासह परिसरातून सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. याबाबत परदेशी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक रमेश शेंडे तपास करीत आहेत.