जळगावमध्ये आढळला पालकांविना तीनवर्षीय बालक | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

found krushna

जळगावमध्ये आढळला पालकांविना तीनवर्षीय बालक

जळगाव : येथील शिवकॉलनी परिसरात तीनवर्षीय बालक पालकांविना आढळून आला. त्याच्या पालकांनी त्याला घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी वनिता सोनगत यांनी केले आहे. (3 year old child without parents was found in Jalgaon latest marathi news)

हेही वाचा: Nashik : यंदा ‘MVP’ सभासद देणार 21 मते

तीनवर्षीय बालक त्याचे नाव कृष्णा सांगतो. आईचे नाव कमला व वडिलांचे संतोष सांगतो. त्या बालकाला प्रथम बालकल्याण समितीच्या अध्यक्षांकडे सोपविण्यात आले. नंतर धुळे येथील अपंग कुष्ठरोगी स्वालंबन संस्थेतर्फे ठेवण्यात आले.

संबंधित बालकाच्या पालकांनी बालकल्याण समिती (०२५७-२२३९८५१), जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचालित मुलांचे वसतिगृह (०२५७-२२३९५५०), जिल्हा बाल संरक्षण कक्ष (२२२८८२५) येथे संपर्क साधावा. पालकांनी संपर्क न साधल्यास बालकल्याण समितीचे अध्यक्ष बालकाची पुढील पुनर्वसनाची कार्यवाही करतील.

हेही वाचा: बांधकाम विभागातून हिशेबाची कागदपत्रे गायब; गैरव्यवहार लपविल्याचा संशय

Web Title: 3 Year Old Child Without Parents Was Found In Jalgaon Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonmissing case
go to top