Jalgaon News : शेतकरी संघाच्या 15 जागांसाठी 30 उमेदवार | 30 candidates for 15 seats of Shetkari Sangh jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon News : शेतकरी संघाच्या 15 जागांसाठी 30 उमेदवार

Jalgaon News : शेतकरी संघाच्या 15 जागांसाठी 30 उमेदवार

Jalgaon News : भडगाव शेतकरी संघासाठी २१ मेस मतदान होत आहे. यात १५ जागांसाठी ३० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. (30 candidates for 15 seats of Shetkari Sangh jalgaon news)

पंधरा १५ जागांमध्ये ६ जागा विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघ, ४ जागा व्यक्तिशः मतदारसंघ, १ जागा अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ, १ जागा इतर मागासवर्गीय मतदारसंघ, १ जागा विमुक्त जाती जमाती (एनटी) मतदारसंघ, २ जागा महिलांसाठी राखीव आहेत. या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. ११) दुपारी तीनपर्यंत अनेकांनी माघार घेतली.

निवडणुकीसाठी १०९ अर्ज प्राप्त होते. यात १ अर्ज दोनदा दाखल असल्याने तो एकच ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यामुळे १०८ वैध अर्जांपैकी ७८ जणांनी आज दिवसभर नाट्यमयरित्या टप्पयाटप्प्याने माघार घेतल्याने या निवडणुकीत केवळ ३० अर्ज शिल्लक राहिले असल्याची माहिती सहाय्यक निबंधक महेश कासार यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सर्वसाधारण संस्था मतदारसंघात ९ रिंगणात आहे. व्यक्तिशः मतदारसंघात १०, महिला मतदारसंघात ४, इमाव मतदार संघात २ तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात २, विमुक्त जाती भटक्या जमाती, विमाप्र मतदारसंघात ३ असे एकूण ३० उमेदवार रिंगणात आहेत. यात सत्ताधारी गटासह महाविकास आघाडी असे दोन गटात निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे. निवडणुकीसाठी ४ हजार ३१२ मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

टॅग्स :Jalgaonelection