Jalgaon Accident News : बाजरीच्या पोत्यानं घेतला तरूणाचा जिव | 35 year old man died in an accident when bike hit tree jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Jalgaon Accident News : बाजरीच्या पोत्यानं घेतला तरूणाचा जिव

Jalgaon News : बाजरीचे पोतं (कट्टा) दुचाकीवरून घेवून जात असताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळली. या अपघातात म्हसावद येथील ३५ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू झाला. (35 year old man died in an accident when bike hit tree jalgaon crime news)

नागदूली ते पद्मालय मंदीराच्या प्रवेशद्वारदम्यान गेल्या मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

योगेश पंडीत गायकवाड (वय ३५, रा. म्हसावद) असे मृताचे नाव आहे. योगेश हे एरंडोल येथून दुचाकीवरून बाजरीचे पोतं (कट्टा) घेवून घरी म्हसावद येण्यासाठी निघाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला.

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. बुधवारी (ता. ३१) सकाळी दहाला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस नाईक कालसिंग बारेला तपास करीत आहेत.

टॅग्स :Nashikdeathaccident case