Jalgaon Crime News : चोरीच्या ‘म्युजिक सिस्टीम’चा आवाज पोलिसांच्या कानी; भंडारी घरफोडीतील 4 संशयितांना अटक

 arrested
arrested esakal

Jalgaon Crime News : चोरीच्या म्युझिक सिस्टीमचा घुमणारा आवाज अलगतपणे एका पोलिसाच्या कानात पडला अन्‌ चार संशयितांना अटक करण्यात आली. चौघांनी पोलिस कोठडीत गुन्ह्याची कबुली देत चोरीचा माल पोलिसांना काढून दिला. (4 suspects arrested in burglary Suspects confess to Bhandaris burglary Jalgaon Crime News)

अनुराग स्टेट बँक कॉलनीतील आनंद भंडारी ७ ते ११ एप्रिलदरम्यान कुटुंबासह गावी गेले होते. त्यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी लॅपटॉप, हार्डडिक्स आणि साऊंड सिस्टीम चोरून नेली होती. याबाबत ११ एप्रिलला रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

एक महिन्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिस नाईक सुशील चौधरी यांनी सरोज ऊर्फ साजीद राजू तडवी याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व साथीदारांची नावे सांगितली.

त्यावरून गुन्हेशोध पथकाने भरत संजय सपकाळे (वय २१), रोहित संजय लोखंडे (१९) व विक्की महेंद्र कोळी (२१, तिन्ही रा. समतानगर) यांना अटक केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

 arrested
Crime News: गर्लफ्रेंड सोबत फिरणाऱ्या रिक्षाचालकावर मुलीच्या जुन्या मित्राचा चाकू हल्ला

म्युझिक सिस्टीमचे गल्लीत कौतुक

सरोजकडे असलेल्या म्युझिक सिस्टमवर वाजणारे गाणे शेजाऱ्यांना सुखावणारे होते. महागडा म्युझिक सिस्टीम सरोज वाजवत असल्याची माहिती पोलिस नाईक सुशील चौधरी यांना कळाली. त्यांनी चौकशी केली असता, सरोज तडवी म्युझिक सिस्टीम वाजवत होता, तर भरत सपकाळे लॅपटॉपवर गेम खेळत होता.

दोघांकडे महागड्या वस्तूंबाबत चौकशी केली असता, त्यांनी अनुराग स्टेट बँक कॉलनीतील गुन्हा कबूल केला. संशयितांनी लॅपटॉप, साऊंड सिस्टीम आणि हार्डडिस्क काढून दिली. सरोज वगळता अटकेतील तिन्ही संशयितांवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

इतरही गुन्हेही त्यांच्याकडून उघड होण्याची शक्यता पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी व्यक्त केली.

 arrested
Crime News: नात्याला काळीमा फासणारी घटना; रागाच्या भरात पत्नीची दोरीने गळा आवळून हत्या; नातेवाइकांचा आरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com