Jalgaon Crime News : अडीच महिन्यांनंतर अपघाताचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : अडीच महिन्यांनंतर अपघाताचा गुन्हा

जळगाव : शहरातील आठवडे बाजारातील पोलिस चौकीसमोर कारच्या धडकेत चाळीसवर्षीय गृहस्थ जखमी झाल्याची घटना घडली होती. (40 year old gentleman was injured in car collision after 2 months case register in police station)

या अपघात प्रकरणी तब्बल अडीच महिन्यांनंतर कारचालकाविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील गटाणी चाळ येथे विलास रमेश सपकाळे (वय ४०) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत.

गेल्या २४ डिसेंबर २०२२ ला ते दुचाकीने आठवडे बाजारात पोलिस चौकीसमोरून जात असताना कारने (एमएच ४३, एएल ५९४४) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात श्री. सपकाळे खाली पडून त्यांच्या कंबरेला दुखापत झाली होती.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

अपघातानंतर कारचालक निघून गेला होता. उपचार घेतल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी सपकाळे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कारचालक राहुल शेवाळे (रा. कासमवाडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक मनोज पवार तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaoncrimeaccident case