
Jalgaon Crime News : चाळीसगावात 43 हजारांचा गांजा जप्त
Jalgaon News : येथील नेताजी चौकातील एकास अवैध गांजाविक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४३ हजार ९०० किमतीचा माल जप्त करण्यात आहे. (43 thousand ganja seized in Chalisgaon jalgaon crime news)
शहरातील नेताजी चौकातील रहिवासी संशयित जगदीश जगन्नाथ महाजन (वय ५२) अवैध गांजा विक्री करत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून २ किलो २२८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना फोटोग्राफर गोपाल चितोडकर, वजन माप करणारे नीलेश सराफ (रा. सराफ बाजार) यांनी सहाय्य केले. पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व उज्ज्वलकुमार म्हस्के तपास करीत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप पाटील, महसूल नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, सहायक पोलिस निरीक्षक सागर ढिकले, पोलिस कर्मचारी योगेश बेलदार, नितीश पाटील, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, विनोद भोई, दीपक पाटील, भटू पाटील, राहुल सोनवणे, प्रवीण जाधव, विनोद खैरनार, नीलेश पाटील,अमोल भोसले, रवींद्र बच्छे, संदीप पाटील, नंदकिशोर महाजन, आशुतोष सोनवणे, नरेंद्र चौधरी यांनी केली.