Jalgaon Crime News : 5 लाखांत घर बळकावल्याची तक्रार; 6 संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Crime news
Crime newsesakal

Jalgaon Crime News : खरेदी केलेले घरात लिव अ‍ॅन्ड लायसन्सचा करार करून राहणाऱ्या कुटुंबाने खोटे व बनावट दस्ताऐवजावर खोटी सही करून पाच लाखांत घर बळकाविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (5 lakh house grab complaint 6 Fraud offenses against suspects Jalgaon Crime News)

खोटेनगरजवळील दिव्यजीवन वाटिका आश्रमजवळ संदीप शिवराम गुजर वास्तव्यास आहेत. मेहरुण- महाबळ शिवारातील घर त्यांनी २००८ मध्ये अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी यांच्याकडून ५ लाखांत विकत घेतले होते. तेच घर २०१९ मध्ये अमित सुरेंद्र भाटीया यांना १२ लाख ९० हजारांत विक्री केली केले.

तेव्हापासून या घरामध्ये अनिरुद्ध कुलकर्णी त्यांच्या कुटुंबासोबत लिव अ‍ॅन्ड लायसन्स करारनामानुसार राहत होते. भाटीया यांनी घर खरेदी करण्यापूर्वी अनिरुद्ध कुलकर्णी यांना पत्र देऊन घर खाली करण्यास सांगितले होते.

मात्र, करारनाम्याची मुदत न संपल्याने कुलकर्णी यांनी घर खाली केले नाही. करार मुदत संपल्यावर नवीन मालक अमित भाटीया यांना परस्पर ताबा देण्याचे अनिरुद्ध कुलकर्णी यांनी मान्य केले होते.

त्यानंतर घर मालकासह महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता कुलकर्णी यांनी वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू केल्याने भाटीया यांनी कुलकर्णी कुटुबियांविरुद्ध घर खाली करून मिळावे, यासाठी न्यायालयात दावा दाखल केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crime news
Sangli Crime: क्रूरतेचा कळस! अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाला फेकलं विहिरीत

असा आहे बनावट करारनामा

दावा दाखल झाल्यानंतर कुलकर्णी यांनी ६ फेब्रुवारी २०२३ ला न्यायालयात सात कागदपत्रे दाखल केली. यामध्ये ९ जुलै २००७ चा आपसांत समझोताचा करारनामा होता. यावर मुद्रांक विकत घेणारा मिलिंद नारायणराव सोनवणे (रा. जळगाव) व करार लिहून देणारा संदीप शिवराम गुजर व लिहून घेणारा अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी यांच्या करारनाम्याची झेरॉक्स प्रत होती.

या करारनाम्यात पाच लाख हातउसनवारीने दिलेल्या पैशांच्या बदल्यात वसुलीच्या सुरक्षिततेसाठी हे घर लिहून देणाऱ्याच्या खरेदीखतावर नोंदवून द्याययची आहे, तसेच खरेदीखत करून घेतल्यानंतर सरकारी दप्तरी नावावर फेरफार नोंद करायची नाही.

दरम्यान, न्यायालयात सादर केलेला करारनामा खोटा व बनावट असून, त्यावर संदीप गुजर यांची स्वाक्षरीही बनावट असल्याचे दिसून आले. त्यांनी अनिरुद्ध कुलकर्णी यांना हा करारनामा कधीही करून दिलेला नाही,

तसेच नोटरी करणारे कालिंदी चौधरी यांना ओळखत नसून, त्यांच्याकडील रजिस्टवरही सही केलेली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे संदीप गुजर यांना समजले. त्यांनी शनिवारी (ता. ६) रात्री शहर पोलिसांत तक्रार दिली.

Crime news
Dhule Crime News : धुळ्यात कनिष्ठ सहाय्यक अटकेत; पंचायत समिती शाखा अभियंत्याकडेच लाच मागितली

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

त्यानुसार अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी, सुभद्रा अनिरुद्ध कुलकर्णी, अनिकेत अनिरुद्ध कुलकर्णी (तिघे रा. शारदा कॉलनी), मिलिंद नारायण सोनवणे (रा. नूतन वर्षा कॉलनी, महाबळ), मंगल चंपालाल पाटील,

ए. पी. बावस्कर (रा. शेगाव, ता. जि. बुलढाणा) यांनी नवीपेठेतील कालिंदी चौधरी यांच्या कार्यालयात संगनमत करून खोटा दस्ताऐवजाावर खोट्या स्वाक्षरी करून न्यायालयात सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

हे पत्र केले होते न्यायालयात सादर

घराचा कोणाशीही व्यवहार करायचा नाही. व्याजाने घेतलेली रक्कम व्याजासह परतफेड करीत नाहीत, तोपर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिलाच्या मोबदल्यात दरमहा तीन टक्के रक्कम व्याजापोटी द्यायची आहे.

घेतलेली पाच लाखांची रक्कम व्याजासह परतफेड केल्यानंतर घर मिळकतीचे खरेदीखत पुन्हा नावावर करून द्यावे लागेल, त्यावेळी होणारा खरेदी खताचा खर्चही करावा लागेल, अशा अटी- शर्तींचे पत्र न्यायालयात सादर केले होते.

Crime news
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षांची शिक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com