Jalgaon : तळेगाव शिवारातून 5 लाखांचा डंपर चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Jalgaon : तळेगाव शिवारातून 5 लाखांचा डंपर चोरीला

बातमीदार : जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील तळेगाव शिवारातील एका हॉटेलाच्या बाजूला उभा केलेला पाच लाख रुपयांचा डंपर (Dumper) अज्ञाताने लंपास (Theft) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (5 lakh worth dumper stolen from Talegaon Area Jalgaon crime news)

याबाबत सविस्तर वृत्त, राजू काशिनाथ निकम (वय-५६) रा. नाचवेल ता. कन्नड जि. औरंगाबाद हा वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. एस. ए. यादव यांच्या मालकीच्या हायवा डंपरवर (क्र. एम.एच.१२ एफ झेड ७१०६) गेल्या चार महिन्यांपासून निकम हा ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. सध्या या डंपरने तळेगाव ते खडकी दरम्यानच्या रेल्वे लाईनवर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. दिवसभराचा काम झाल्यानंतर निकम हा तळेगाव शिवारातील नक्षत्र हॉटेलला मुक्काम असतो. मात्र सदर हॉटेलच्या बाजूला त्यांनी वरील डंपर उभी करून चावी कॅबीनला ठेवून दिली. याचाच फायदा घेऊन भामट्याने रविवार, ३ जूलै रोजी सकाळी ७:३० वाजताच्या पूर्वी उभा असलेला डंपर लंपास केला.

हेही वाचा: प्रभाग 20च्या प्रारूप यादीत 900 मतदारांचा घोळ

सदर डंपरची किंमत अंदाजे ५ लाख रुपये होती. तत्पूर्वी या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावर राजू काशिनाथ निकम यांनी तात्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठून भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Nashik : गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामास वेग

Web Title: 5 Lakh Worth Dumper Stolen From Talegaon Area Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonthief
go to top