जळगाव : अज्ञात चोरट्याने चोरल्या 6 गायी

खळ्यात बांधलेल्या गायी 6 गायी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
6 cows stolen by thief
6 cows stolen by thiefesakal

अमळनेर (जि. जळगाव) : शहरातील पैलाड भागातून सहा गायी चोरीस गेल्याची घटना बुधवारी (ता. ११) रात्री चोपडा नाल्याजवळ घडली. दशरथ युवराज लांडगे यांचे पैलाड भागात चोपडा नाक्याजवळ खळे असून, बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या दोन गाईना चारा पाणी करून घरी निघून गेले होते. ते गुरुवारी सकाळी खळ्यात आले असता त्यांना गायी दिसल्या नाहीत. त्यांनी शेजारी विचारपूस केली असता अजय विठोबा पाटील यांनी त्यांच्या देखील सहा गायी चोरीस गेल्याचे सांगितले.

अज्ञात चोरट्याने लांडगे यांच्या ३० हजारांच्या २ गायी तर अजय यांच्या ५३ हजाराच्या ४ अशा ८३ हजाराच्या गायी चोरून नेल्या आहेत. अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी सुनील पाटील तपास करीत आहेत.

6 cows stolen by thief
जळगावात एकाच दिवसात दोन प्राणघातक हल्ले
6 cows stolen by thief
Jalgaon : जुगार अड्ड्यावर राडा; जिंकणाऱ्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com