Jalgaon News : कोठारीनगरात वृद्धाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Jalgaon News : कोठारीनगरात वृद्धाची आत्महत्या

जळगाव : शहरातील कोठारीनगरातील ६० वर्षीय वृद्धाने (Old Man) घराच्या वरील मजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (60 year old man committed suicide by hanging himself with a rope on upper floor of house jalgaon news)

पंढरी हरीदास चव्हाण, असे मृताचे नाव आहे. पंढरी चव्हाण भाजीपाला विक्री करून उदनिर्वाह करीत होते. रविवारी (ता. २६) सायंकाळी वरच्या मजल्यावरील खोलीत ते गेले. तिथे त्यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सायंकाळी त्यांची नात निकिताला आजोबा लटकलेले दिसले. ती पळत पळत खाली घरात आली व हा प्रकार सांगितला. पंढरी चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचे पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी जिजाबाई, विवाहित मुलगी, संतोष आणि गुरू ही दोन मुले, सून व नातवंडे आहेत. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिस नाईक रेवानंद साळुंखे तपास करीत आहे.