Jalgaon Fraud Crime : ऑनलाईन ट्रेडींगच्या नावे 9 लाखांचा गंडा

Crime
Crimeesakal

Jalgaon Crime News : ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संशयिताला गुजरात राज्यातील भावनगर येथून रविवारी (ता. २८) रात्री दहाला जळगाव सायबर पोलिसांनी अटक केली. (9 lakhs looted in name of online trading fraud jalgaon crime news)

रावेर तालुक्यातील एकाला ऑनलाईन ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ९ लाख ३० हजारांची ऑनलाईन फसवणूक केली होती. याबाबत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी फिर्यादीचे व्हॅट्‌सॲप आणि बँकेतील व्यवहारच्या मदतीने संशयित भावनगर येथील असल्याचे निष्पन्न केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime
Jalgaon Online Fraud : यू-ट्यूब Subscriptionच्या नावे 3 लाखांचा गंडा

सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोलिस नाईक प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांना भावनगरला रवाना केले. पथकाने संशयित विजय ऊर्फ अजय दयाभाई कलसरीया (वय ३३, रा. अम्रेली, भावनगर) याला ताब्यात घेतले.

चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच लाख रुपये हस्तगत केले आहेत. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर तपास करीत आहे.

Crime
Jalgaon Fraud Crime : 28 लाखांची 2 दुकाने परस्पर पत्नीच्या नावे; संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com