Aam Aadmi Party : सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा ‘आप’कडून निषेध | Aam aadmi party condemns action against Sisodia in Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Aam Aadmi Party

Aam Aadmi Party : सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा ‘आप’कडून निषेध

अमळनेर (जि. जळगाव) : आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावरील कारवाई निंदाजनक असून, अमळनेर आम आदमी पक्षाने निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन दिले.

नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी निवेदन स्वीकारले. (Aam aadmi party condemns action against Sisodia jalgaon news)

विश्रामगृहासमोर जोरदार घोषणा देऊन लोकशाहीची विटंबना चालली आहे, या बाबत आक्रोश करण्यात आला. तेथून मोर्चाद्वारे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चात आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गणेश पवार, धनंजय सोनार, स्वप्नील पाटील, नारायण पाटील, रामकृष्ण पाटील, महेंद्र साळुंके, अनिल पाटील,

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

नामदेव पाटील, शिवाजी पाटील, सलीम लियाकत वायरमन, उमाकांत ठाकूर, अनिल बोरसे आदी उपस्थित होते. पोलिस अंमलदार डॉ. शरद पाटील व कैलास पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.